२९ हजार शासकीय कर्मचारी संपात सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 01:25 AM2020-01-09T01:25:07+5:302020-01-09T01:25:29+5:30

तृतीय आणि चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याने सुटीचे दिवस वगळता इतर दिवस वर्दळीचा असणा-या शासकीय कार्यालयांमध्ये बुधवारी शुकशुकाट पाहण्यास मिळाला.

90 thousand government employees participated in the crisis | २९ हजार शासकीय कर्मचारी संपात सहभागी

२९ हजार शासकीय कर्मचारी संपात सहभागी

googlenewsNext

ठाणे : देशव्यापी संपात जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांत काम करणाऱ्या तृतीय आणि चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याने सुटीचे दिवस वगळता इतर दिवस वर्दळीचा असणा-या शासकीय कार्यालयांमध्ये बुधवारी शुकशुकाट पाहण्यास मिळाला. त्याचबरोबर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासह ठाणे जिल्हा परिषद, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मनोरुग्णालयाच्या आवारात त्यात्या कर्मचाºयांनी निदर्शने के ली. जिल्ह्यात सुमारे २९ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचे सांगून राजपत्रित अधिकारी संघटनेने या संपाला पाठिंबा दिल्याचे कामगारांच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
केंद्र व राज्यस्तरावरील सार्वजनिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी संपाची हाक बुधवारी दिली. त्यानुसार, राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाºयांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या मागण्यांसाठी त्यात्या कार्यालयांत आवारात एकत्र येऊन निदर्शने केली. या संपात पदोन्नती वर्ग-२, वर्ग-३ चे अधिकारी-कर्मचारी आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी संपात सहभागी असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी दिली.
कर्मचाºयांनी संपात सहभागी होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी महासंघाबाबत खोडसाळपणा केलेला असतानाही कर्मचाºयांनी त्यास भीक घातलेली नाही. महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील २९ हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील प्रांत, तहसीलदार, सर्कल आॅफिस, तलाठी आणि जिल्हा परिषद तसेच जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याचे दिसून आले.
>मनोरुग्णालयात निदर्शने : मनोरुग्णालयातील कर्मचाºयांनी या संपात सहभाग घेऊन निदर्शने केली. ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून त्या कर्मचाºयांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रदेश युवा इंटक सरचिटणीस राहुल पिंगळे हजर होते.
झेडपीत काळ्या फिती लावून निषेध
ठाणे जिल्हा परिषदेतील राज्य सरकारी कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदवून निदर्शनेही केली.
रुग्णसेवेवर कोणताही परिणाम नाही
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचाºयांनीही या संपात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होईल, अशी शक्यता वाटत होती. मात्र, प्रशासनाने खबरदारी घेऊन रुग्णसेवेवर परिणाम होऊ दिला नाही. परिचारिका प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी व इतर नर्सेस या संप कालावधीत हजर ठेवल्या होत्या. तसेच दिवसभरात रुग्णालयात तीन शस्त्रक्रिया केल्याची माहिती रुग्णालय
प्रशासनाने दिली.

Web Title: 90 thousand government employees participated in the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे