ठाण्यातील जुगार अड्डयावर गुन्हे अन्वेषण विभागाची धाड: ९१ जुगाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 06:37 PM2019-08-28T18:37:12+5:302019-08-28T18:42:44+5:30

नौपाडा पोलिसांपाठोपाठ आता ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि ठाणेनगर पोलिसांनी संयुक्त कारवाईत बाजारपेठेतील एका दोन मजली इमारतीमध्ये चालणा-या जुगार अड्डयावर बुधवारी पहाटेच्या १ ते ६ च्या सुमारास धाड टाकली. या कारवाईमध्ये सुमारे ९१ जुगाऱ्यांना अटक करुन त्यांच्याकडून दोन लाख १२ हजार ५८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

91 gamblers arrested for gambling in Thane | ठाण्यातील जुगार अड्डयावर गुन्हे अन्वेषण विभागाची धाड: ९१ जुगाऱ्यांना अटक

दोन लाख १२ हजार ५८० रुपयांची रोकड जप्त

Next
ठळक मुद्देठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोन लाख १२ हजार ५८० रुपयांची रोकड जप्तअड्डा मालक मात्र झाला पसार

ठाणे: जुगार अड्डयांवर धाडीचे सत्र सुरुच असून नौपाडा पोलिसांपाठोपाठ आता ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी पहाटेच्या सुमारास बाजारपेठेतील एका दोन मजली इमारतीमध्ये चालणा-या जुगार अड्डयावर धाड टाकली. या कारवाईमध्ये सुमारे ९१ जुगा-यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे आणि जुगार अड्डयांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्व पोलीस उपायुक्त तसेच गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर चॅरिटेबल ट्रस्ट क्लबच्या नावाखाली पत्ते खेळून मोठया प्रमाणात जुगार खेळला जात असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त प्रविण पवार यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ठाणे रेल्वे स्थानक रस्त्यावरील इंडियन चँरीटेबल ट्रस्ट या क्लबवर २८ आॅगस्ट रोजी पहाटे १ ते ६ वाजण्याच्या सुमारास गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पोलीस उपनिरीक्षक दत्ता सरक, कैलास सोनवणे, पोलीस हवालदार सुभाष मोरे, आनंदा भिलारे आणि संभाजी मारे तसेच ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर आदींच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.
या कारवाईमध्ये अरविंद ब्रिंद्रा, अरविंद दळवी, मनोज शिंदे आदी ९१ रमी हा जुगार खेळतांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून जुगाराच्या सामुग्रीसह दोन लाख १२ हजार ५८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या सर्व आरोपींची जामीनावर सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: 91 gamblers arrested for gambling in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.