निवडणूकीच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असूनही ९२ टक्के ठाणे पोलिसांनी बजावला मतदानाचा हक्क

By जितेंद्र कालेकर | Published: October 25, 2019 09:23 PM2019-10-25T21:23:09+5:302019-10-25T21:50:31+5:30

पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या सूचनेनुसार ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आयुक्तालयातील सर्व पोसिलांना पोस्टल मतपत्रिका उपलब्ध करुन दिल्यामुळे पोस्टल मतदानाची ही प्रक्रीया पार पडली. त्यामुळेच निवडणूकीच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असूनही ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील नऊ हजार २१२ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी ९२ टक्के म्हणजे आठ हजार ५६३ पोलिसांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

92% Thane police voted for voting rights despite being busy in election settlement | निवडणूकीच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असूनही ९२ टक्के ठाणे पोलिसांनी बजावला मतदानाचा हक्क

निवडणूकीच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असूनही ९२ टक्के ठाणे पोलिसांनी बजावला मतदानाचा हक्क

Next
ठळक मुद्देटपालाद्वारे केले मतदान९२८४ पैकी ९२१२ पोलिसांनी केले मतदान पोलीस महासंचालकांच्या सूचनेवरुन झाली कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: निवडणूकीच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असूनही ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील नऊ हजार २१२ पोलीस अधिकारी कर्मचा-यांपैकी ९२ टक्के म्हणजे आठ हजार ५६३ पोलिसांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या सूचनेनुसार ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आयुक्तालयातील सर्व पोसिलांना पोस्टल मतपत्रिका उपलब्ध करुन दिल्यामुळे पोस्टल मतदानाची ही प्रक्रीया पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराट्र विधानसभा निवडणूकीच्या वेळी बंदोबस्तात व्यस्त असल्यामुळे कोणीही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी हे मतदानाच्या मुलभूत हक्कापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना पोस्टल मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी दिले होते. निवडणूकीची अधिसूचना जाहिर झाल्यापासून ते मतमोजणीच्या दिवसापर्यंतचा कालावधी हा एक महिन्यांपेक्षा अल्प असल्यामुळे तसेच ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांची संख्या मोठी असल्यामुळे निवडणूक प्रचार बंदोबस्त चालू असतांना सर्वच पोलीस कर्मचाºयांसाठी टपाली मतदानाची प्रक्रीया वेळेत पूर्ण करणे हेही एक आव्हान होते. मात्र, पोलीस आयुक्त फणसळकर यांनी बंदोबस्तावरील पोलीस कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदानापासून वंचित राहणार नाही, ते टपाली पद्धतीने मतदान करतील, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील ३५ पोलीस ठाणी तसेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्व युनिटमध्ये टपाली मतदानाची प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी टपाली मतदान कक्षही स्थापन करण्यात आला होता. या कक्षांकडे पाठपुरावा करण्यासाठी कक्षाच्या कामकाजाचा दैनंदिन आढावा घेऊन टपाली मतदानासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तालयाच्या पातळीवर या टपाली मतदान कक्षाची निर्मिती करण्यात आली होती.
* विशेष प्रशिक्षण
टपाली मतदान कक्षात नेमलेल्या सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांना या प्रक्रीयेची माहिती होण्यासाठी त्यांना १८ सप्टेंबर २०१९ रोजी एका प्रशिक्षण कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. तहसिलदार तथा समन्वय अधिकारी प्रज्ञा सावंत यांनी टपाली मतपत्रिकेचे उपस्थितांना प्रशिक्षण दिले.
सुरुवातीच्या टप्यात ठाणे आयुक्तालयातील पोलिसांना मतदार यादीतील नाव, अनुक्रमांक आदी माहितीची पडताळणी करुन मतदार यादीत नाव नसलेले पोलीस कर्मचाºयांनी फॉर्म क्रमांक सहा भरुन पाठविले. मतदान यादीत नाव असलेल्या कर्मचा-यांनी टपाली मतपत्रिका मिळण्यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे फॉर्म क्रमांक १२ भरुन पाठविला.
..................
टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्यानंतर भरुन परत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी अल्प वेळ असल्याने ठाणे आयुक्तालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे समन्वय अधिकाºयांनी संपर्क साधून टपाली मतपत्रिका विनाविलंब पाठविण्यासाठी पाठपुरावाही केला. पोलीस आयुक्तांसह सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला, अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे आदींनी यासाठी पाठपुरावाही केला.
.............
असे झाले मतदान


ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात नऊ हजार २८४ पोलीस कर्मचारी अधिकारी असून यामध्ये फॉर्म १२ आणि सहा नउ हजार २१२ जणांनी भरला. यातील आठ हजार ५६३ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात निवडणूक बंदोबस्तामध्ये व्यस्त असूनही इतक्या मोठया प्रमाणात प्रथमच टपाली मतदानाद्वारे मतदान करुन पोलिसांनी अनोखा पायंडा पाडल्याचे बोलले जात आहे.

Web Title: 92% Thane police voted for voting rights despite being busy in election settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.