घरफोडीत ९२ हजारांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:44 AM2021-09-22T04:44:15+5:302021-09-22T04:44:15+5:30

----------------------------------- सोन्याची चेन लंपास कल्याण : पश्चिमेकडील बेतुरकरपाडा परिसरात राहणाऱ्या रुपा धानिक या शिवाजीचौक, आंबेडकर रोडवरून रविवारी सकाळी पावणेसातच्या ...

92,000 cash lampas in burglary | घरफोडीत ९२ हजारांची रोकड लंपास

घरफोडीत ९२ हजारांची रोकड लंपास

Next

-----------------------------------

सोन्याची चेन लंपास

कल्याण : पश्चिमेकडील बेतुरकरपाडा परिसरात राहणाऱ्या रुपा धानिक या शिवाजीचौक, आंबेडकर रोडवरून रविवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून सहकाऱ्यासह पोबारा केला. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

--------------------------------------

दुचाकी चोरीला

डोंबिवली : सुदर्शन अय्यर यांनी त्यांची दुचाकी पश्चिमेकडील जोंधळे कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या दरम्यान घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

----------------------------------------

दुचाकीचालक महिला जखमी

डोंबिवली: गोग्रासवाडी वामननगर याठिकाणी राहणाऱ्या अनिता पवार या रविवारी सकाळी १० वाजता दुचाकीवरून मुलीसह पाथर्ली रोडने शेलार नाका येथे जात असताना मातोश्री हॉटेलजवळ त्यांच्या गाडीला रिक्षाची धडक बसली. याप्रकरणी रिक्षा चालकाविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

--------------------------------------

रिक्षा पार्क करण्यावरून वाद

डोंबिवली: सोसायटीत रिक्षा पार्क करण्यावरून झालेल्या वादात शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली विजय पवार, गौरव पवार, वंदना पवार, दिनकर रॉय आणि अन्य एका विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात अनिल शिरपूरकर यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता देसलेपाडा, लोढा हेरीटेज, वास्तूसृष्टी बिल्डिंगच्या आवारात घडली.

-------------------------------------

Web Title: 92,000 cash lampas in burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.