ठाणे जिल्ह्यात आज आढळले ९३७ कोरोना रुग्ण; सहा जणांचा  मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 12:48 AM2021-03-12T00:48:46+5:302021-03-12T00:49:35+5:30

ठाणे शहरात २९१ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६४ हजार ५८२ झाली आहे. शहरात आज तिघांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४०८ झाली. कल्याण - डोंबिवलीत २६४ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. (corona patients)

937 corona patients found in Thane district today, Six died | ठाणे जिल्ह्यात आज आढळले ९३७ कोरोना रुग्ण; सहा जणांचा  मृत्यू 

ठाणे जिल्ह्यात आज आढळले ९३७ कोरोना रुग्ण; सहा जणांचा  मृत्यू 

Next

ठाणे: जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे ९३७ रुग्ण आढळले असून सहा जणांचा  मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ७३ हजार १३० रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या सहा हजार ३२१ झाली आहे.  (937 corona patients found in Thane district today, Six died)
 
ठाणे शहरात २९१ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६४ हजार ५८२ झाली आहे. शहरात आज तिघांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४०८ झाली. कल्याण - डोंबिवलीत २६४ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता ६५ हजार ४६४ रुग्ण बाधीत असून एक हजार २०९ मृत्यूची नोंद आहे. 

उल्हासनगरमध्ये आज ३१ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या १२ हजार ७९ झाली. तर ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे. भिवंडीत आज १५ बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ८८१ असून मृतांचा आकडा ३५६ आहे. मीरा भाईंदरमध्ये आज ५३ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरात  बाधितांची संख्या २७ हजार ७२३  असून ८०५ जणांचा मृत्यू झाला आहे.

अंबरनाथमध्ये आज ३६ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे बाधीत नऊ हजार ५१ असून ३१६ जणांचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये आज ६२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीतांचा आकडा १० हजार ३५४ वर गेला असून एकही मृत्यू नाही. येथे आतापर्यंत १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे ग्रामीणमध्ये आज १४ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. एथील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९ हजार ७८७ झाल असून ५९८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 
 

Web Title: 937 corona patients found in Thane district today, Six died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.