ठाणे जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ९५.५६ टक्के निकाल; पुन्हा एकदा निकालात मुलींनी मारली बाजी
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 27, 2024 01:43 PM2024-05-27T13:43:22+5:302024-05-27T13:43:37+5:30
जिल्ह्यात एकूण १, ०८ हजार ३७८ इतकी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये ५३ हजार ७८० इतक्या मुली उत्तीर्ण झाल्या आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : इयत्ता बारावीच्या निकालानंतर यावर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. ठाणे जिल्ह्याचा निकाल ९५.५६ टक्के इतका लागला आहे गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा ९६.७९ निकाल लागला आहे तर मुलांचा निकाल ९४.३९% इतका लागला आहे.
जिल्ह्यात एकूण १, ०८ हजार ३७८ इतकी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये ५३ हजार ७८० इतक्या मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर ५४ हजार ५९८ इतकी मुले उत्तीर्ण झाली आहेत. दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला त्यामुळे इंटरनेटवर सर्वांनी निकाल पहिला. हा निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफे , घरी, मोबाईल, संगणकवर विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी आधार घेतला आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
जिल्ह्यातील एकूण १,१३,४०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यात ५७ हजार ८४१ मुले आणि ५५, ५६२ मुलींनी परीक्षा दिली होती.