कोरोनाचे नवे ९६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:26 AM2021-06-22T04:26:46+5:302021-06-22T04:26:46+5:30
------------------ ‘लोकल प्रवासास परवानगी मिळावी’ कल्याण : राज्यात शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले असून, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थिती ...
------------------
‘लोकल प्रवासास परवानगी मिळावी’
कल्याण : राज्यात शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले असून, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थिती अनिवार्य आहे. मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील शाळांमधील हे कर्मचारी रेल्वेने प्रवास करतात. परंतु, कोरोनामुळे रेल्वेने प्रवासास बंदी असल्याने त्यांना मनस्ताप होत आहे. सरकारला निवेदन देऊनही याबाबत परवानगी न मिळाल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने सोमवारी कल्याण स्थानकात आंदोलन केले. कल्याण स्थानक मुख्य व्यवस्थापक अनुपकुमार जैन यांना याबाबत निवेदनही देण्यात आले.
--------------------------------------------------
योगदिन साजरा
कल्याण : आंतरराष्ट्रीय योगदिन सोमवारी नूतन विद्यालय येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे, उद्योजक मिलिंद कुलकर्णी, संस्थेचे अन्य पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षिका, शाळेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी सूर्यनमस्कार आणि योगमुद्रा केल्या.
-------------------------
मिल्खा सिंग यांना अनोखी श्रद्धांजली
डोंबिवली : कोविडमुळे प्रख्यात धावपटू मिल्खा सिंग यांचे नुकतेच निधन झाले. रिजन्सी रनर्स ग्रुपतर्फे त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतीय युवांचे प्रेरणास्थान असलेल्या आणि ९१ वर्षी निधन झालेल्या मिल्खा यांना रिजन्सी रनर्स ग्रुपच्या अमित म्हात्रे, योगेश खडके, तुषार फलक, मंदार जोशी, रूपाली जोशी, आरती तन्ना अय्यर, शशी पांडे, अथर्व म्हात्रे, दीपक गुप्ता, विजय गोसावी या सदस्यांनी ९१ किमी धावून श्रद्धांजली वाहिली.
--------------