ठाणे जिल्ह्यात सोमवारी ९६७ कोरोनाचे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 03:32 AM2020-08-18T03:32:05+5:302020-08-18T03:32:16+5:30
कल्याण-डोंबिवलीत २५० रुग्ण आढळले आहेत. या शहरात आता २४ हजार ६७० बाधित झाले असून सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या ५०३ झाली आहे.
ठाणे : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ९६७ रुग्ण नव्याने आढळल्याने रुग्णसंख्या एक लाख सात हजार ५३३ झाली आहे. तर, ३७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तीन हजार ७५ वर पोहोचला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
सोमवारी १९३ नवे रुग्ण सापडल्यामुळे बाधितांची संख्या २३ हजार ४८८ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत २५० रुग्ण आढळले आहेत. या शहरात आता २४ हजार ६७० बाधित झाले असून सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या ५०३ झाली आहे.
नवी मुंबईत २४० रुग्णांची नोंद झाली आहे. उल्हासनगरला ३८ रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात सोमवारी फक्त चार रुग्ण सापडले आहेत. अंबरनाथ शहरात २१ रुग्ण नव्याने आढळले असून दोन मृत्यू झाले आहेत. बदलापूरमध्ये ५५ रुग्ण वाढले. यामुळे बाधित रुग्ण तीन हजार ४८४ झाले आहेत.
>रायगडमध्ये
१८५ नवे रु ग्ण
अलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी १८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या २० हजार ९२५ वर पोहोचली आहे. १७ हजार ५२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ७२, पनवेल ग्रामीणमध्ये
२० रुग्ण सापडले आहेत. पनवेल महानगरपालिका १७७, पनवेल ग्रामीण ३३, उरण १३, खालापूर १७, कर्जत १०, पेण १७, अलिबाग २२, असे एकूण ३३८ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
>वसई-विरारमध्ये
११६ रुग्ण कोरोनामुक्त
वसई : वसई-विरार शहरात सोमवारी ११६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले. यामुळे ११ हजार ९६२ रुग्णांनी आजवर कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, दिवसभरात ६९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.