भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत ९८ टक्के मतदान
By नितीन पंडित | Published: April 28, 2023 07:35 PM2023-04-28T19:35:23+5:302023-04-28T19:35:30+5:30
सेवा संस्था गटातील ३३९ पैकी ३३५ मतदारांनी मतदानात केले.तर ग्रामपंचायत गटातील ११३८ मतदारांपैकी ११२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यांच्या मतांची सरासरी ९८ टक्के एवढी झाली आहे.
भिवंडी - भिवंडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती च्या १४ संचालक निवडीसाठी शुक्रवारी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी मतदान पार पडले.एकूण ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशिब आजमावत आहेत.या मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने मतदारांनी भाग घेत मतदान केले.सायंकाळी चार वाजता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर सुमारे ९८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सेवा संस्था गटातील ३३९ पैकी ३३५ मतदारांनी मतदानात केले.तर ग्रामपंचायत गटातील ११३८ मतदारांपैकी ११२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यांच्या मतांची सरासरी ९८ टक्के एवढी झाली आहे. या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर सकाळ पासूनच उमेदवार,मतदार,समर्थक राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेतेमंडळी यांनी मोठी गर्दी केल्याने धामणकर नाका ते वऱ्हाळ देवी रोड या वर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेऊन पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली .शनिवारी सकाळी नऊ वाजता मतदान केंद्र असलेल्या शाळेच्या परिसरातील स्व सौ पुष्पलता विजय जाधव सभागृहात मतमोजणी होणार आहे.