९९ लाख ४२ हजार ४०७ नागरिकांना मिळणार पहिला/दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:43 AM2021-04-28T04:43:47+5:302021-04-28T04:43:47+5:30
--------- जिल्ह्यात एक लाख चार हजार जणांनी घेतला दुसरा डोस लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत ११ लाख ४७ हजार ६६१ जणांचे ...
---------
जिल्ह्यात एक लाख चार हजार जणांनी घेतला दुसरा डोस
लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत ११ लाख ४७ हजार ६६१ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात ९५ हजार १२७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला व दुसरा डोस ५३ हजार २९९ जणांनी घेतला आहे. पहिल्या फळीतील ८२ हजार ७०२ जणांनी पहिला व ३५ हजार १२७ जणांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षांपुढील तब्बल सात लाख ७६ हजार ७६९ जणांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. याशिवाय त्यातील एक लाख चार हजार ६३६ नागरिक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसचे लाभार्थी ठरले आहेत. आजपर्यंत ११ लाख ४७ हजार ६६१ नागरिक या कोरोना लसीकरणाचे लाभार्थी ठरले आहेत. यातील सात लाख ७६ हजार ७६९ जणांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. तर एक लाख चार हजार ६३६ जणांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन आपले लसीकरण यशस्वी केले आहे.