कल्याण येथे १२, १३ जानेवारी रोजी होणार कोकण इतिहास परिषदचे ९ वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 03:49 PM2018-10-11T15:49:01+5:302018-10-11T15:54:16+5:30
दरवर्षी भरविण्यात येणारे कोकण इतिहास परिषदचे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन यंदा कल्याण येथे पार पडणार आहे.
ठाणे: कल्याण येथे १२, १३ जानेवारी २०१९ रोजी कोकणइतिहास परिषदचे ९वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई, संचालित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली कल्याण जिल्हा ठाणे येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाचे अध्यक्षपद डॉ. मंजिरी भालेराव, पुणे या भूषविणार आहेत. त्या टिळक महाराषट्र विद्यापीठ इंडोलॉजी डिपार्टमेंटच्या हेड आहेत.या परिषदेत कोकणचाइतिहास व लोकसंस्कृतीवर अनेक मान्यवर आपापले शोध निबंध सादर करणार आहेत अशी माहिती कोकण इतिहास परिषदेच्या वतीने गुरुवारी दिली.
या वर्षीचा “जीवन गौरव” पुरस्कार दुर्गतपस्वी आप्पा परब यांना देण्यात येणार आहे तसेच २०१८ साली कोकणावरील संशोधन ग्रंथास पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय , महाड येथे झालेल्या परिषदेतील शोध निबंधाचे पुस्तक प्रकाशन तसेच कोकण इतिहास पत्रिका त्रैमासिकाचे प्रकाशन या प्रसंगी होईल या प्रसंगी होईल. आर्टस, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय गोवेली येथे कोकण विषयक निबंध स्पर्धा, किल्ले स्पर्धा, मोडी लिपी अभ्यास सराव स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा होणार असून त्यांना परिषदेतर्फे पारितोषिक देण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी महाड येथे हे अधिवेशन घेण्यात आले होते. जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, प्राचार्य डॉ.के. बी. कोरे, इतिहास विभागाचे प्रा. लक्ष्मण भोईर, कोकण इतिहास परिषद, कल्याण शाखा अध्यक्ष प्रा. जितेंद्र भामरे, स्थानिक संशोधक अविनाश हरड सहकार्य करणार आहेत. यावेळी कोकण इतिहास परिषद मुख्य शाखेचे अध्यक्ष .रविंद्र लाड, कार्यवाह . सदाशिव टेटविलकर, जीवनदीप शैक्षणिक संस्था, गोवेलीचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, कोषाध्यक्ष, डॉ. भारती जोशी, डॉ. विद्या प्रभू , कोकण इतिहास परिषद , कल्याण शाखा अध्यक्ष प्रा. जितेंद्र भामरे आदी उपथित होते. अधिक माहितीसाठी सदाशिव टेटविलकर भ्रमणध्वनी:९७६९४२८३०६ यांच्याशी संपर्क साधावा ते आवाहन करण्यात आले आहे.