पोहायला गेलेल्या बारावीच्या विद्याथ्यार्चा ठाण्यातील उपवन तलावात बुडून मृत्यू
By जितेंद्र कालेकर | Published: July 17, 2023 08:13 PM2023-07-17T20:13:14+5:302023-07-17T20:13:28+5:30
अग्निशमन दलाने बाेटीच्या मदतीने घेतला शाेध, पाेहता येउनही दम लागल्याने बुडाल्याचा अंदाज
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्याच्या उपवन तलावात मित्रांसह पोहायला गेलेल्या १७ वर्षीय आदित्य लक्ष्मण पवार (रा. साई सहकार सोसायटी, लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार) या आर. जे. ठाकूर महाविदयालयातील बारावीतील विदयाथ्यार्चा बुडून मृत्यू झाल्याची साेमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. बाेटीच्या माध्यमातून तब्बल तीन तास शाेध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आल्याची माहिती वर्तकनगर पाेलिसांनी दिली.
आदित्य हा आपल्या तीन ते चार मित्रांसोबत उपवन तलावात पोहण्यासाठी १७ जुलै रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास गेला होता. उपवन तलावाच्या पायलादेवी मंदिराजवळ असलेल्या सेल्फी पाॅईंट येथील कठडयावरुन त्याने उडी घेतली हाेती. ताे विसर्जन घाटाकडे पाेहून जात हाेता. त्याचवेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच दम लागल्याने ताे विसर्जन घाटापयर्ंुत पाेहचलाच नाही. मध्यभागीच ताे बुडाला. त्याच्या मित्रांनी काही अंतर जाउन त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नही केले. मात्र, त्यांना अपयश आले. ही माहिती पालिका आपत्ती व्यवस्थापनाला दुपारी २. १२ वाजण्याच्या सुमारास सागर वर्मा याच्याकडून मिळाल्यानंतर घटनास्थळी वर्तकनगर पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच अ िग्नशमन दलाच्या पथकांनी धाव घेतली. दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत दोन बोटींच्या सहाय्याने शोध घेतल्यानंतर आदित्यचा मृतदेह मिळाला. उत्तरीय तपासणीसाठी ताे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी चाैकशी करण्यात येत असल्याचे वर्तकनगर पाेलिसांनी सांगितले.