खानापूर जवळ दोन दुचाकीच्या धडकेत १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
By रूपेश हेळवे | Updated: June 8, 2023 16:40 IST2023-06-08T16:39:16+5:302023-06-08T16:40:27+5:30
ही घटना बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

खानापूर जवळ दोन दुचाकीच्या धडकेत १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
सोलापूर : दोन दुचाकींच्या समोरा समोर झालेल्या धडकेत एका १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अथर्व लक्ष्मण लुगडे ( वय १४, रा. खानापूर, तुळजापूर) असे या मुलाचे नाव आहे. तो नातेवाईकांसोबत दुचाकीवर मागे बसून जात होता. ही घटना बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.
मृत अथर्व हा आपल्या नातेवाईकांसोबत खानापूर नाक्यावरून गावी जात होता. तेव्हा समोरून आलेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरात धडक दिली. या धडकेत अथर्व दुचाकीवरून खाली पडला. त्याला डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला लगेच उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात रात्री उशीरा दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.