उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात गर्भवती महिलेच्या पोटातून काढला दीड किलोचा मासाचा गोळा
By सदानंद नाईक | Published: October 2, 2024 12:21 PM2024-10-02T12:21:36+5:302024-10-02T12:22:16+5:30
महिलेचे व बाळाचे वाचविले प्राण
सदानंद नाईक
उल्हासनगर : गर्भवती महिलेच्या पोटातून दीड किलो वजनाचा मासाचा गोळा काढण्यात मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले. अश्या असंख्य कठीण शस्त्रक्रिया रुग्णालयात करून नागरिकांना जीवदान दिल्याची प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे व डॉ तृप्ती रोकडे यांनी दिली आहे.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात एका गर्भवती महिलेच्या पोटात दुखत होते. यापूर्वी महिलेने खाजगी रुग्णालयात उपचार करूनही दुखणे थांबले नोव्हते. आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने, अखेर ती मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यासाठी आली. महिलेच्या विविध वैधकीय चाचण्यानंतर महिलेच्या पोटात गोळा असल्याचे उघड झाले.
तज्ञ डॉक्टरांच्या निघराणी खाली शस्त्रक्रिया करून, महिलेच्या पोटातून तब्बल दीड किलोचा मांसाचा गोळा डॉक्टरांनी बाहेर काढला. अर्चना सिंहवा असे महिलेचे नाव असून ती गर्भवती होती. शस्त्रक्रिया धोक्याची आणि किचकट असूनही डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून महिलेचा जीव वाचविला आहे. शिवाय तिची प्रसूती सुखरूप करून बाळालाही जीवनदान दिले. या शस्त्रक्रियेत सहभागी झालेल्या डॉक्टरसह अन्य कर्मचाऱ्यांचा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी अभिनंदन केले.