उल्हासनगरात रस्त्यावर १६ मजली इमारत? महापालिकेकडून इमारतीच्या कामाला स्थगित
By सदानंद नाईक | Published: October 18, 2023 05:49 PM2023-10-18T17:49:03+5:302023-10-18T17:49:38+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील झलक नावाच्या इमारतीला सन-२०२१ साली महापालिका नगररचनाकार विभागाचे तत्कालीन नगररचनाकार गुडगुडे यांनी परवानगी दिली.
उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील १६ मजल्याची झलक इमारत डीपी रस्त्याला बाधित असल्याचे उघड झाल्यावर इमारत बांधकाम परवानगीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. अखेर नगररचनाकार विभागाने इमारत बांधकामाला स्थगिती दिली असून पुन्हा नगररचनाकार विभाग वादात सापडला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील झलक नावाच्या इमारतीला सन-२०२१ साली महापालिका नगररचनाकार विभागाचे तत्कालीन नगररचनाकार गुडगुडे यांनी परवानगी दिली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात इमारतीला टीडीआर नुसार वाढीव चटईक्षेत्र देऊन बांधकाम परवानगी देण्यात आली. इमारतीचे १६ मजल्या पर्यंत बांधकाम झाल्यानंतर, इमारत मुख्य रस्त्याला बाधित होत असल्याचे उघड झाले. याप्रकारने पुन्हा महापालिका नगररचनाकार विभाग वादात सापडला. सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षाच्या काही पदाधिकार्यांनी झलक इमारत रस्त्याला बाधित असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. पालिका नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी इमारत बांधकामाला स्थगिती दिली असून बांधकाम परवाना देतांना रस्त्या बाबत माहिती नोव्हती का? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
महापालिका नगररचनाकार विभागाकडून दरवर्षी बांधकाम परवान्यांतून ५० कोटीचे उत्पन्न नगररचनाकार मुळे यांनी गेल्या दोन वर्षांपासून मिळून दिले होते. मात्र यावर्षी विभागाचे उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात विनापरवाना कर्मचारी विभागात कामाला ठेवल्या प्रकरणी नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच बांधकाम परवाना प्रकरणीही विभाग वादात सापडला होता. शहरात कोणतेच रस्ते शहर विकास आराखडानुसार होत नसल्याचेही उघड झाले आहे.
जुन्या परवान्यांवर इमारतीला टीडीआर
रस्त्यात बाधित होत असलेल्या १६ मजल्याची झलक इमारतीला जुन्या परवान्यांनुसार टीडीआर दिला. असे नगररचनाकार प्रकाश मुळे यांचे म्हणणे आहे. तसेच रस्ताला बाधित होत असल्याचे उघड झाल्यावर, इमारतीच्या बांधकामाला स्थगिती दिली. अशी माहिती नगररचनाकार मुळे यांनी दिली आहे