कोपरी पूर्व येथील मीठ बंदर रोडच्या गणपती विसर्जन घाटाजवळील खाडीत बुडाला ३५ वर्षीय तरुण
By अजित मांडके | Updated: July 20, 2024 18:53 IST2024-07-20T18:52:04+5:302024-07-20T18:53:08+5:30
चेतन प्रजापती असे बुडालेल्या तरुणाचे नाव

कोपरी पूर्व येथील मीठ बंदर रोडच्या गणपती विसर्जन घाटाजवळील खाडीत बुडाला ३५ वर्षीय तरुण
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कोपरी पूर्व येथील मीठ बंदर रोड येथे गणपती विसर्जन घाट येथे खाडीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने चेतन प्रजापती (३५) रा. चेंदणी कोळीवाडा हा तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. ठाण्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यात कोपरी विसर्जन घाट येथील खाडीत पोहण्यासाठी चेतन उतरला होता.
दुपारी १. १६ च्या सुमारास तो पाण्यात उतरला होता. परंतु पोहतांना पोहचण्याचा अंदान न आल्याने तो खोडीत बुडाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्याचे शोधकार्य सुरु झाले. या ठिकाणी दोन बोटींच्या साह्याने खाडीमध्ये अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी त्याचा शोध घेत होते. परंतु सांयकाळी उशीरापर्यंत हे शोधकार्य सुरु होते.