उल्हासनगर हिराघाट बोटक्लबच्या विसर्जन घाटात ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
By सदानंद नाईक | Published: September 11, 2022 11:38 AM2022-09-11T11:38:19+5:302022-09-11T11:38:53+5:30
उल्हासनगर महापालिकेने कॅम्प नं-३ हिराघाट बोटक्लब येथे विसर्जन घाट बनविला आहे
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका हिराघाट बोटक्लब विसर्जन घाटात शनिवारी ६ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री १० वाजता मुलाचा मृतदेह नातेवाईकांना मिळाला असून महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला.
उल्हासनगर महापालिकेने कॅम्प नं-३ हिराघाट बोटक्लब येथे विसर्जन घाट बनविला आहे. शनिवारी बोटक्लब शेजारील भैय्यासाहेब आंबेडकरनगर मधील सहा वर्षाचा मुलगा राजवीर नितीन बेलेकर हा दुपारी ४ वाजता दिसेनासे झाल्यावर, आई-वडील व नावईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली. राजविरचा शोध घेत असतांना, काही जणांनी राजविर याला बोटक्लबकडे जातांना बघितल्याचे सांगितले. रात्री १० वाजण्याच्या सुमारास बोटक्लब विसर्जन घाटात त्याचा शोध घेतला असता, राजविरचा निचपत पडलेला देह मिळून आला. त्याला मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकारने मुलाच्या आई-वडीलासह नातेवाईकांनी महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला.
महापालिकेने हिराघाट बोटक्लब विसर्जन घाट ठिकाणी काही दिवस सुरक्षारक्षक तैनात करायला हवे होते. सुरक्षारक्षक तैनात असतातर, मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना झाली नसती. असा आरोप नागरिकांकडून होत आहे. तर दुसरीकडे आपले लहान मुले कुठे खेळतात. याकडे मुलांच्या पालकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. बोटक्लब विसर्जन घाटातील पाणी मुर्तीची विरघळणे होत नाही. तो पर्यंत पाणी कमी करता येत नाही. पाणी काढल्यास विसर्जन केलेल्या मुर्त्या उघड्या पडण्याची शक्यता असते. मात्र काही दिवस सुरक्षेचा उपाय म्हणून सुरक्षारक्षक ठेवणे गरजेचे होते. असे मत काही नागरिक व्यक्त करीत आहेत. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस घटनेचा शोध घेत आहेत. तर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सविस्तर माहिती घेऊन नियमानुसार कारवाई करण्याचे संकेत दिले.