उल्हासनगरात उभा राहणार ९ फुटी बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा
By सदानंद नाईक | Published: April 14, 2023 06:48 PM2023-04-14T18:48:36+5:302023-04-14T18:50:14+5:30
उल्हासनगरात ९ फुटी बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.
उल्हासनगर : कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरातील डॉ आंबेडकर चौकात अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी ९ फूटी उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याला मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार बालाजी किणीकर यांनी दिली. एका वर्षात पुतळा बसविण्याचे काम पूर्ण होणार असून शासनाने १ कोटीचा निधी त्यासाठी देण्यात आला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील डॉ आंबेडकर चौकात बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. याठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांची आहे. महापालिका महासभेत याबाबत ठराव मंजूर केला. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नाला यश आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी पूर्णाकृती पुतळ्याला १ कोटीचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून सुभाष टेकडी येथील डॉ आंबेडकर चौक, चोपडा कोर्ट, महापालिका, कॅम्प नं-५ येथील लालचक्की आदी ठिकाणच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शेकडोच्या संख्येनें नागरिक रात्री १२ वाजता एकत्र आले होते.
शिवसेना ठाकरे गटाच्यांवतीने जिल्हा संघटक धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली बाईक रैलीची आयोजन केले. लालचकी चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भव्य देखावा उभारला. तसेंच १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून १३२ कीलोच्या लाडुचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ६ वाजल्यापासून विविध विभागात मिरणुकीला सुरवात झाली. महापालिका प्रांगणातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आयुक्त अजीज शेख यांनी पुष्पहार अर्पण केले.