भिवंडीत अवैध्य रेती उत्खनन करणारा एक बार्ज एक सक्शन पंप केला नष्ट; महसूल प्रशासनाची कारवाई
By नितीन पंडित | Published: February 20, 2024 05:03 PM2024-02-20T17:03:19+5:302024-02-20T17:05:34+5:30
कारवाई पथकाची चाहूल लागताच बार्ज वरील कामगारांनी पाण्यात उडी मारून ते पसार झाले.
नितीन पंडित, भिवंडी :भिवंडी व ठाणे तालुक्याच्या सीमेवरील उल्हास नदी व ठाणे खाडी पात्राता अवैध्य रेती उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्याने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशाने भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार अभिजित खोले यांच्या मार्गदर्शना खाली काल्हेर ते वेहेळे कोन येथील खाडीपात्रात भिवंडी अपर मंडळ अधिकारी अतुल नाईक व खारबाव मंडळ अधिकारी सुधाकर कामडी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केलेल्या कारवाईत खाडी पात्रता एक बार्ज व एक संकशन पंप आढळून आले.
कारवाई पथकाची चाहूल लागताच बार्ज वरील कामगारांनी पाण्यात उडी मारून ते पसार झाले.परंतु पलायन करण्यापूर्वी त्यांनी बार्ज चा वाॅल काढल्याने त्यात पाणी शिरले व अशा परिस्थितीत बोटीच्या सहाय्याने बार्ज ओढून आणने शक्य नसल्याने तो तिथेच बुडवण्यात आला.तर सक्शन पंप बोटीच्या साहाय्याने काल्हेर बंदर येथील खाडी किनारी पाण्याबाहेर काढून त्याचा पुन्हा वापर होऊ नये म्हणून गॅस कटर च्या सहाय्याने कापून नष्ट करण्यात आला आहे.या कारवाईत एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया नारापोली पोलिस ठाणे येथे सुरू असल्याची माहिती भिवंडी तहसील कार्यालयातील महसूल प्रशासनाने दिली आहे.