लहान भावासह पोहायला गेलेल्या मुलाचा खदानीत बुडून मृत्यू
By कुमार बडदे | Updated: May 19, 2023 20:44 IST2023-05-19T20:44:21+5:302023-05-19T20:44:50+5:30
कुमार बडदे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्राः दिवा शहरातील बेतवडे गावात असलेल्या खदानी मध्ये शुक्रवारी काही मुले पोहण्यासाठी गेली होती.त्यावेळी खदानीतील ...

लहान भावासह पोहायला गेलेल्या मुलाचा खदानीत बुडून मृत्यू
कुमार बडदे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्राः दिवा शहरातील बेतवडे गावात असलेल्या खदानी मध्ये शुक्रवारी काही मुले पोहण्यासाठी गेली होती.त्यावेळी खदानीतील पाण्याचा अंदाज न आल्यमुळे १६ वर्षाच्या रोहित राऊत या मुलाचा बुडून मृत्यू झाला.तो त्याच्या १० वर्षाच्या लहान भावासह पोहण्यासाठी गेला होता.बुडत असताना त्याने लहान भावाला पाण्यात खेचण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याचा हात झटकून तो खदानीच्या वरती आल्याने सुदैवाने बचावला.नंतर त्यानेच रोहित बुडाला असल्याची माहिती त्याच्या पालकांना दिली.मृत रोहित दिवा शहरातील दादुस नगर मधील शिवगण चाळीत रहात होता.
या घटनेची माहिती मिळताच शिळ अग्निशमन दलाचे जवान तसेच ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचा-यांनी मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढून तो या मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिला.त्यांनी कायदेशीर बाबीची पूर्तता करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला.