प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला आनंद देणारा अर्थसंकल्प; संपूर्ण राज्याला विकासाची दिशा देणार-  निरंजन डावखरे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2023 07:44 PM2023-03-09T19:44:47+5:302023-03-09T19:45:00+5:30

ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडली जाणार असल्यामुळे ठाणेकरांना जलवाहतूक उपलब्ध होईल, असं निरंजन डावखरे म्हणाले.

A budget that makes every family member happy; said that Niranjan Dawkhare | प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला आनंद देणारा अर्थसंकल्प; संपूर्ण राज्याला विकासाची दिशा देणार-  निरंजन डावखरे  

प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला आनंद देणारा अर्थसंकल्प; संपूर्ण राज्याला विकासाची दिशा देणार-  निरंजन डावखरे  

googlenewsNext

ठाणे: स्वातंत्र्याच्या अमृतकाळात महाराष्ट्राच्या विकासाचे `पंचामृत' सूत्र घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आनंद देणारा आहे. भाजपा-शिवसेना युतीचे सरकार समाजाप्रती संवेदनशील सरकार असल्याचे प्रतित झाले. अध्यात्म आणि विकासाचा सुवर्णसंगम करणारा हा पंचामृत अर्थसंकल्प आहे. तो सर्वसमावेशक व संपूर्ण राज्याला विकासाची दिशा देणारा आहे. तसेच देशात अव्वल स्थानावर महाराष्ट्राला कायम ठेवणारा आहे, असं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जनभागीदारीतून अर्थसंकल्प सादर केला. ४० हजार नागरिकांच्या सुचनांच्या साह्याने तयार केलेला हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने लोकांना हवा असलेला अर्थसंकल्प ठरला आहे. शेतकरी, महिला, नोकरदार, विद्यार्थी, अल्प मानधनात काम करणारे शिक्षण सेवक व अंगणवाडी सेविका-मदतनीस, छोटे व्यापारी, ओबीसी, आदिवासी, दलित बांधव, मच्छिमार, निराधार नागरिक, दिव्यांग आदी घटकांचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आला. प्रत्येक घटकासाठी अर्थसंकल्पात दिलासादायक तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना १२ हजार रुपये सन्मान निधी, एसटीत महिलांना ५० टक्के प्रवास, अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मानधन, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ झाली आहे.

कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू फळ विकास योजना क्रांती घडविणारी आहे. कोकणात सिंचन सुविधांसाठी विशेष कृती कार्यक्रम, खारभूमी बंधाऱ्यांच्या कामांना गती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल. लेक लाडकी योजनेतून मुलीला १८ वर्ष झाल्यावर ७५ हजार रुपये, महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण, इतर मागासवर्गीयांसाठी १० लाख घरांची मोदी आवास घरकुल योजना, आपला दवाखाना आदी योजना जीवनमान बदलणाऱ्या आहेत. वेगवान प्रवासासाठी ठाणे शहरासाठी महत्वाच्या असलेल्या वर्तुळाकार मेट्रोला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यावर ती सुरू केली जाईल. तर ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडली जाणार असल्यामुळे ठाणेकरांना जलवाहतूक उपलब्ध होईल, असं निरंजन डावखरे म्हणाले.

Web Title: A budget that makes every family member happy; said that Niranjan Dawkhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.