ठाण्यात पार्क केलेल्या कारने घेतला पेट

By अजित मांडके | Published: January 11, 2024 10:24 PM2024-01-11T22:24:48+5:302024-01-11T22:25:07+5:30

ठाणे : माजिवाडा येथील पार्किंग प्लाझा जवळील रस्त्याशेजारी पार्क केलेल्या हुंडाई वेरना कारने अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवारी रात्री ...

A car parked in Thane caught fire | ठाण्यात पार्क केलेल्या कारने घेतला पेट

ठाण्यात पार्क केलेल्या कारने घेतला पेट

ठाणे: माजिवाडा येथील पार्किंग प्लाझा जवळील रस्त्याशेजारी पार्क केलेल्या हुंडाई वेरना कारने अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास समोर आली. ही आग अर्ध्या तासात नियंत्रणात आणण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

पार्क केलेल्या कारलाआग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेत ती आग नियंत्रणात आणली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून यावेळी १ फायर व ०१-रेस्क्यू वाहन पाचारण केले होते. दरम्यान, ही आग कशामुळे लागली, हे अद्याप कळू शकले नाही.

Web Title: A car parked in Thane caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.