उल्हासनगर न्यायालयासमोर आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: February 4, 2024 17:42 IST2024-02-04T17:42:20+5:302024-02-04T17:42:49+5:30
याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला.

उल्हासनगर न्यायालयासमोर आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
उल्हासनगर: उल्हासनगर न्यायालयाच्या प्रांगणात आमदार गणपत गायकवाड यांच्यासह अन्य आरोपींना आणताच त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवनकर, वैभव गायकवाड, नागेश बडेकर, विकी गणोत्रा यांच्यासह ७ पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल करून आमदार गायकवाड, हर्षल केणे व संदीप सरवनकर यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना शनिवारी दुपारी ४ नंतर उल्हासनगर न्यायालयात आणण्यात येत असल्याने, आमदार गायकवाड यांच्या शेकडो समर्थकांनी न्यायालय परिसरात एकच गर्दी केली होती.
यावेळी समर्थकाकडून आमदार गायकवाड यांच्या नावाने घोषणा दिल्या. तसेच गायकवाड यांना न्यायालयात आणले. त्यावेळी झालेल्या घोषणमुळे पोलीस त्रस्त झाले. हुल्लडबाजी व घोषणाबाजी केल्या प्रकरणी गुड्डू खान, मोना शेठ, निलेश बोबडे, शीला राज, सुरज खान, अंजली खामकर, विद्या त्रिंबके, भावेश तोल, सरिता जाधव, लावण्या दळवी व यशोदा माळी आदी जणांवर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.