तृतीयपंथीयांचा वापर करून लहान मुलींना सामानासह घराबाहेर काढणाऱ्या सवतीवर गुन्हा दाखल 

By धीरज परब | Published: June 24, 2024 07:00 PM2024-06-24T19:00:57+5:302024-06-24T19:02:25+5:30

Mira Road Crime News: घरात लहान अल्पवयीन मुली असताना तृतीयपंथी आणि एका दाम्पत्या सोबत मिळून मुलींना घरातील सामानासह बाहेर काढून घराला टाळे ठोकणारयूं सवत सह अन्य चौघांवर काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

A case has been registered against Savati, who used third parties to take girls out of the house with their belongings  | तृतीयपंथीयांचा वापर करून लहान मुलींना सामानासह घराबाहेर काढणाऱ्या सवतीवर गुन्हा दाखल 

तृतीयपंथीयांचा वापर करून लहान मुलींना सामानासह घराबाहेर काढणाऱ्या सवतीवर गुन्हा दाखल 

 मीरारोड - घरात लहान अल्पवयीन मुली असताना तृतीयपंथी आणि एका दाम्पत्या सोबत मिळून मुलींना घरातील सामानासह बाहेर काढून घराला टाळे ठोकणारयूं सवत सह अन्य चौघांवर काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरारोडच्या हटकेश भागातील ग्रीष्मा कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या अफसाना हनीफ कस्सार ह्या नातलगा कडे गेल्या होत्या . २१ जून रोजी त्यांच्या दोन अल्पवयीन मुली घरात एकट्याच होत्या तर एक मुलगी गोरेगाव येथे गेली होती . त्यावेळी अफसाना हिची सवत रेहाना , त्याच इमारतीत राहणारा धर्मा आणि त्याची पत्नी व २ तृतीयपंथी असे ५ जणांनी मिळून बळजबरी घरत घुसून दोन्ही मुलींना बाहेर काढले आणि घरातील सामान देखील बाहेर काढून खाली टाकून दिली . त्या नंतर अफसाना यांच्या घराला बाहेरून टाळे लावले.

सदर प्रकार कळताच अफसाना  ह्या मीरारोड येथे आल्या व २२ जून रोजी त्यांनी काशिगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . पोलिसांनी रेहाना सह धर्मा व त्याची बायको आणि २ तृतीयपंथी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांच्या मदतीने घरातून काढलेले सामान अफसाना यांनी पुन्हा आपल्या घरी नेऊन ठेवले.

आपण गेल्या ७ - ८ वर्षां पासून येथे रहात असून सदर सदनिका आपल्या पतीची आहे . रेहाना हि सवत असून तिने धर्मा ह्याच्याशी संगनमत करून अल्पवयीन मुलींना धक्काबुक्की व शिवीगाळ करून घरातून सामानासह बाहेर काढले होते. ह्यात आपले दागिने व पैसे सुद्धा चोरीला गेल्याचे अफसाना यांनी सांगितले. 

Web Title: A case has been registered against Savati, who used third parties to take girls out of the house with their belongings 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.