सीआरझेड बाधित सरकारी जागेत बेकायदा रस्ता बांधणाऱ्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

By धीरज परब | Published: June 11, 2023 05:16 PM2023-06-11T17:16:55+5:302023-06-11T17:17:10+5:30

बांधलेला बेकायदा रस्ता देखील पालिकेने तोडून टाकला आहे . 

A case has been registered against the former corporator who constructed an illegal road in the government land affected by CRZ | सीआरझेड बाधित सरकारी जागेत बेकायदा रस्ता बांधणाऱ्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

सीआरझेड बाधित सरकारी जागेत बेकायदा रस्ता बांधणाऱ्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

googlenewsNext

मीरारोड - भाईंदर पश्चिमेस राजकीय फायद्यासाठी सीआरझेड व सरकारी जागेत बेकायदेशीरपणे सिमेंट रस्ता व गटार बांधकाम करणाऱ्या भाजपाच्या माजी नगरसेवकावर केंद्र सरकारच्या मीठ विभागाने गुन्हा दाखल केला आहे . तर बांधलेला बेकायदा रस्ता देखील पालिकेने तोडून टाकला आहे . 

भाईंदर पश्चिमेस महापालिका मुख्यालय व भाईंदर पोलीस ठाण्याच्या मागील भागात शास्त्री नगर व नेहरू नगर हि झोपडपट्टी आहे . केंद्र सरकारच्या मीठ विभागाने येथील मिठागर क्षेत्र अजगर पठाण आदींना लीज वर दिले होते . त्याचे मुदत संपल्या नंतर सध्या न्यायालयात वाद सुरु आहे .  शास्त्री नगर येथे पालिकेने बसवलेल्या फायबर शौचालय पासून नेहरू नगरच्या मागील भागास जोडणारा  मोठा सिमेंट रस्ता व गटारीचे बांधकाम माजी भाजपा नगरसेवक अशोक तिवारी याने केल्याची तक्रार सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता यांनी मीठ विभाग , महापालिका आदींना केली होती . 

मीठ विभागाचे पथक देखील सदर भागात पाहणी करत असताना त्यांना रस्त्याचे काम करताना ४ - ५ कामगार दिसले होते . त्यांनी काम बंद करण्यास सांगितले असता कामगार पळून गेले . काम सुरु असताना तेथील लोकां कडे चौकशी केली असता सदर काम माजी नगरसेवक अशोक तिवारी करत असल्याचे सांगण्यात आले . याचा अहवाल जाधव यांनी मिठागर उपायुक्त यांना संदर केला होता . 

मीठ विभागाने महापालिकेस पत्र व्यवहार केला असता आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशा नुसार २७ एप्रिल रोजी पालिकेने देखील सदर रस्त्याचे काम केले नसल्याचे स्पष्ट कळवले . 

राजकीय फायद्यासाठी हे बेकायदा काम केले गेल्याने काही राजकारण्यांनी कारवाई होऊ नये म्हणून प्रयत्न चालवल्याची चर्चा होती . महापालिकेचे पथक एकदा कारवाईसाठी गेले होते मात्र कारवाई न करताच परत फिरले होते . 

अखेर ९ जून रोजी महापालिकेने मीठ विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात बेकायदा रस्ता व गटार तोडून टाकले . त्याच दिवशी केंद्र सरकारच्या वतीने जाधव यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर अशोक तिवारी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तिवारी याने अनधिकृतपणे जमिनीचा ताबा घेऊन कोणतीही परवानगी नसताना रस्ता व गटार बांधकाम केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे . 

कृष्णा गुप्ता ( अध्यक्ष , सत्यकाम फाउंडेशन ) - सरकारी जमिनी बळकवुन बेकायदा बांधकामे करून ती विकायची , मतांसाठी त्यांना बेकायदा सोयी सुविधा देऊन संरक्षण देण्याचे काम काही नगरसेवक , राजकारणी व महापालिकेचे अधिकारी भ्रष्ट संगनमताने करत आहेत . तिवारी याने बेकायदा रस्ता बांधण्यासाठी  खर्च कुठून केला ? भ्रष्टाचाराचा वा काळा पैसे आहे का ? याची सखोल चौकशी झाली पाहिजे . सीआरझेड व एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे . 

Web Title: A case has been registered against the former corporator who constructed an illegal road in the government land affected by CRZ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.