मीरारोड मध्ये विकासकाची जमीन बळजबरीने कब्जा करणाऱ्या विकासकासह महिला, पुरुषांवर गुन्हा दाखल
By धीरज परब | Published: January 14, 2024 11:43 PM2024-01-14T23:43:23+5:302024-01-14T23:43:39+5:30
Mira Road Crime News: मीरारोड मधील आकृती हब टाऊन जवळ युनिक शांती डेव्हलपर्स यांच्या जमिनीवर महिला आणि पुरुषांची टोळी घेऊन कब्जा करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एक विकासक व त्याचे ११ ते १३ महिला - पुरुष साथीदारांवर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
मीरारोड - मीरारोड मधील आकृती हब टाऊन जवळ युनिक शांती डेव्हलपर्स यांच्या जमिनीवर महिला आणि पुरुषांची टोळी घेऊन कब्जा करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एक विकासक व त्याचे ११ ते १३ महिला - पुरुष साथीदारांवर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
मीरा भाईंदर मधील बडे विकासक असलेल्या युनिक शांती डेव्हलपर्सचे दिलेश शाह यांच्या फिर्यादी नुसार , मीरारोडच्या आकृती हब टाऊन जवळ असलेली मौजे नवघर येथील सर्व्हे क्रं. १३५ व १३६ मधील १ हजार ७५४ स्क्वेअर मीटर जागा युनिक शांती डेव्हलपर्सचे भागीदार दिलेश शाह व हार्दिक शाह यांनी खरेदी केली होती . जागेवर कोणी अतिक्रमण करू नये म्हणून साफसफाई करून जमिनीला पत्र्याचे कंपाउंड मारले . त्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावून खाजगी सुरक्षा रक्षक तैनात केले .
दरम्यान सदर जागेवर बळजबरीने कब्जा मिळवण्या करता काही महिला व पुरुषांची टोळी घुसखोरी करणे , सुरक्षा रक्षकांना धमकावणे आदी प्रकार करू लागले . ९ जानेवारी रोजी देखील देखील सदर जागेत घुसून महिला व पुरुषांच्या टोळीने सीसीटीव्हीची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना धमकावत बळजबरीने जागेत घुसखोरी केली . त्या प्रकरणी दिलेश शाह यांच्या फिर्यादी वरून चंदन शांती ग्रुप ऑफ कंपनीचे नरेश शहा सह प्रशांत पांडे, ५ ते ६ महिला व ५ ते ६ पुरुष व्यक्तिंवर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .