वृद्ध आई - वडिलांचा छळ करणाऱ्या मुलासह २ सुना व नातवावर गुन्हा दाखल

By धीरज परब | Published: September 7, 2023 11:20 PM2023-09-07T23:20:28+5:302023-09-07T23:20:38+5:30

सत्यनारायण यांची पत्नी आजारी असून अंथरुणाला खिळलेली असल्याने चालता येत नाही . 

A case has been registered against the son along with 2 daughters-in-law and grandson for harassing elderly parents | वृद्ध आई - वडिलांचा छळ करणाऱ्या मुलासह २ सुना व नातवावर गुन्हा दाखल

वृद्ध आई - वडिलांचा छळ करणाऱ्या मुलासह २ सुना व नातवावर गुन्हा दाखल

googlenewsNext

मीरारोड - भाईंदर पश्चिमेस खाऊ गल्लीच्या ग्रेसी इमारतीत ८५ वर्षांचे सत्यनारायण अग्रवाल हे त्यांची पत्नी , मोठी सून सविता (४८) , लहान मुलगा अरुण (४७) व त्याची पत्नी  अमिषा ( ४४) आणि नातू वंश ( २० ) असे राहतात . सत्यनारायण यांची पत्नी आजारी असून अंथरुणाला खिळलेली असल्याने चालता येत नाही . 

परंतु सविता , अरुण , अमिषा आणि वंश हे वृद्ध सत्यनाराण आणि त्यांच्या पत्नीला  सातत्याने शिवीगाळ, मारहाण करतात व जीवे मारण्याच्या धमक्या देतात . त्यांना जेवण देत नाहीत व त्यांची देखभाल करत नाहीत . कोणत्या ना कोणत्या कारणावरून छळ करतात , त्रास देतात अशी फिर्याद सत्यनाराण यांनी भाईंदर पोलिसात दिली . 

पोलिसांनी बुधवारी सविता , अरुण , अमिषा आणि वंश यांच्यावर भादंवि तसेच ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे . उपनिरीक्षक अनिल करे हे पुढील तपास करत आहेत . 

Web Title: A case has been registered against the son along with 2 daughters-in-law and grandson for harassing elderly parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.