बँकेचे कर्ज माफ केल्याचे सांगून उल्हासनगरात दोन भावाची साडे आठ लाखाची फसवणूक, गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Published: May 15, 2023 06:28 PM2023-05-15T18:28:26+5:302023-05-15T18:28:33+5:30

उल्हासनगर : प्रकाश व भजन बजाज यांनी आयडीएफसी बँकेतून घेतलेले ५० लाखाचे लोन बँकेने बंद केले असल्याचे बनावट लेटर ...

A case has been registered for defrauding two brothers of eight and a half lakhs in Ulhasnagar | बँकेचे कर्ज माफ केल्याचे सांगून उल्हासनगरात दोन भावाची साडे आठ लाखाची फसवणूक, गुन्हा दाखल

बँकेचे कर्ज माफ केल्याचे सांगून उल्हासनगरात दोन भावाची साडे आठ लाखाची फसवणूक, गुन्हा दाखल

googlenewsNext

उल्हासनगर : प्रकाश व भजन बजाज यांनी आयडीएफसी बँकेतून घेतलेले ५० लाखाचे लोन बँकेने बंद केले असल्याचे बनावट लेटर देऊन, कमिशन म्हणून ५ लाख व लोन बंद केल्याचे बनावट एनओसी म्हणून ५० हजार रुपये. त्यानंतर ३५ लाखाचे लोण मंजूर झाले म्हणून अड्डीच लाख कमिशन असे एकून साडे आठ लाखाची फसवणूक केल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात राजू ताराणी यांच्यावर दाखल झाला. 

उल्हासनगर येथे राहणारे प्रकाश बजाज व भजन बजाज या दोन भावानी कल्याण पश्चिम येथील कॅपिटल बँकेतून ५० लाखाचे लोण घेतले होते. दरम्यान कॅपिटल बँकेचे रूपांतर एचडीएफसी बँकेत झाले. जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२२ च्या दरम्यान ओळखीच्या राजू घनशामदास ताराणी यांनी बँकेने ५० लाखाचे लोण बंद केल्याचे बनावट पत्र प्रकाश बजाज यांना देऊन त्या बदल्यात ५ लाखाचे कमिशन घेतले. तसेच बँकेकडून लोण बंद केल्याची बनावट एनओसी पत्र देऊन पुन्हा ५० हजार असे एकून सुरवातीला साडे पाच लाख घेतले.

 त्यानंतर एचडीएफसी बँकेतून ३५ लाखाचे लोण मंजूर झाल्या बाबतचे बनावट पत्र प्रकाश बजाज यांना देऊन, त्याबदल्यात अड्डीच लाखाचे कमिशन घेतले. दरम्यान एकून साडे आठ लाख रुपयांची आपली फसवणूक झाल्याचे बजाज यांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मध्यवर्ती पोलिसांनी राजू ताराणी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A case has been registered for defrauding two brothers of eight and a half lakhs in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.