आमदार प्रताप सरनाईकांची जमीन खरेदीत ७ कोटी ६६ लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

By धीरज परब | Published: July 28, 2023 07:54 PM2023-07-28T19:54:49+5:302023-07-28T19:55:22+5:30

आर्थिक गुन्हे शाखे कडे गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला आहे . 

A case has been registered in the case of fraud of 7 crore 66 lakhs in land purchase of MLA Pratap Sarnaik | आमदार प्रताप सरनाईकांची जमीन खरेदीत ७ कोटी ६६ लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

आमदार प्रताप सरनाईकांची जमीन खरेदीत ७ कोटी ६६ लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

googlenewsNext

मीरारोड -  शिवसेना शिंदे गटाचे आमदार व  उद्योजक प्रताप सरनाईक यांना घोडबंदर भागातील जमीन खरेदीत ७ कोटी ६६ लाखां मोबदला घेऊन देखील जमीन मालकाने बँकेचे कर्ज फेडले नाही व जमीन नावे करून दिली नाही म्हणून काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आर्थिक गुन्हे शाखे कडे गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला आहे . 

मार्टिन ऍलेक्स कोरिआ रा . चिंचोली बंदर , मालाड ह्याने मौजे घोडबंदर  सर्व्हे क्रमांक १९३ हिस्सा क्रं. ९ हि ३०३० चौ. मीटर जागा स्वतःच्या मालकीची असल्याचे व ती विकायची असल्याचे सांगून आ. सरनाईक यांच्या सोबत विक्री करारनामा केला . त्यात मार्टिन याने वेळोवेळी जमिनीचा मोबदला म्हणून  ४ कोटी १६ लाख इतकी रक्कम घेतली. 

तर त्या जागेवर असलेले भाडेकरू उदय मेहता, किशोर तलसानिया व दिपक कन्हैया यांनी ३ कोटी ५० लाख रुपये आ . सरनाईक यांच्या कडून घेतले . करारातील अटीशर्ती प्रमाणे मार्टिन याने  सिटीझन क्रेडिट को.ऑप. बँक चे १ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज फेडायचे होते . मात्र मार्टिन यांनी आ . सरनाईक यांच्या कडून जमिनीचा पूर्ण मोबदला घेतला पण कर्ज फेडले नाही. 

मार्टिन याने कर्ज फेडण्यास तसेच जमीन आ . सरनाईक यांच्या नावावर करण्यास टाळाटाळ चालविल्याने अखेर आ . सरनाईक यांचे स्वीय सहायक शिवाजी नाळे यांच्या फिर्यादी नंतर काशीमीरा पोलिसांनी मार्टिन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . तर गुन्ह्याचा तपास हा आर्थिक गुन्हे शाखे कडे शुक्रवारी देण्यात आला असून  सहायक पोलीस आयुक्त भास्कर पुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनायक पानमंद हे पुढील तपास करत आहेत. 

Web Title: A case has been registered in the case of fraud of 7 crore 66 lakhs in land purchase of MLA Pratap Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.