धारावी किल्ल्या जवळील कांदळवन कत्तल प्रकरणी गुन्हा दाखल

By धीरज परब | Published: July 6, 2023 08:48 PM2023-07-06T20:48:19+5:302023-07-06T20:48:26+5:30

मीरारोड - भाईंदरच्या चौकी जेट्टी आणि धारावी किल्ल्या दरम्यान समुद्र व खाडीच्या संगमावर असलेल्या कांदळवनची कत्तल केल्या प्रकरणी महसूल ...

A case has been registered in the case of Kandalvan slaughter near Dharavi Fort | धारावी किल्ल्या जवळील कांदळवन कत्तल प्रकरणी गुन्हा दाखल

धारावी किल्ल्या जवळील कांदळवन कत्तल प्रकरणी गुन्हा दाखल

googlenewsNext

मीरारोड - भाईंदरच्या चौकी जेट्टी आणि धारावी किल्ल्या दरम्यान समुद्र व खाडीच्या संगमावर असलेल्या कांदळवनची कत्तल केल्या प्रकरणी महसूल विभागाने उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . 

येथील कांदळवनची मोठमोठी झाडे मोठ्या कटर ने कापून समुद्राच्या पाण्यात टाकून देण्यात आली होती. स्थानिक मच्छीमारांसह किल्ला संवर्धन समिती चे रोहित सुवर्णा, श्रमजीवीचे संघटनेचे वसीम पटेल , मनोज राणे आदींनी या बाबत तक्रारी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती . 

प्रांत अधिकारी अविनाश शिंदे व अपर तहसीलदार निलेश गौंड यांच्या निर्देशक नंतर कांदळवन विभागाने तलाठी आदींसह पाहणी करून अहवाल दिला होता . येथील ८ ते १० जुनी - मोठी कांदळवन ची झाडे तोडल्या प्रकरणी तलाठी रमेश फाफाळे यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर अनोळखी व्यक्तीं विरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या भागातील सीसीटीव्ही तपासणीची तसेच कांदळवन लागवडीची मागणी होत असून  कांदळवन तोडून जागा मोकळी करत त्याचा वापर करणाऱ्यांवर संशय आहे . 

Web Title: A case has been registered in the case of Kandalvan slaughter near Dharavi Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.