उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 07:23 PM2024-11-16T19:23:35+5:302024-11-16T19:23:48+5:30

सदानंद नाईक उल्हासनगर : उल्हासनगरातील काही व्हाट्सअप ग्रुपवर आक्षेपार्य पोस्ट व्हायरल करणाऱ्या धर्मेंद्र भिसेन याच्या विरोधात अँड स्वप्नील पाटील ...

A case has been registered in Vitthalwadi Police Station against those who posted offensive posts against Uddhav Thackeray  | उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

सदानंद नाईक
उल्हासनगर : उल्हासनगरातील काही व्हाट्सअप ग्रुपवर आक्षेपार्य पोस्ट व्हायरल करणाऱ्या धर्मेंद्र भिसेन याच्या विरोधात अँड स्वप्नील पाटील यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल केला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली असून शिवसैनिकांनी त्याच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचेही उघड झाले.

शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मॅार्ब केलेले विवादास्पद चित्र धर्मेंद्र भिसेन नावाच्या इसमाने उल्हासनगर मधील काही वॅाट्सॲप ग्रुपवर व्हायरल केले. ऐण निवडणूक दरम्यान वादग्रस्त चित्र पोस्ट केल्याने, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणाऱ्या धर्मेंद्र भिसेन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार प्रहार संघटनेचे अँड स्वप्नील पाटील यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे व निवडणूक निर्णय अधिकारी यांना शनिवारी सकाळी केली.

पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भिसेन याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. दरम्यान काही शिवसैनिक महिलांनी भिसेन यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचे उघड झाले आहे.

Web Title: A case has been registered in Vitthalwadi Police Station against those who posted offensive posts against Uddhav Thackeray 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.