उल्हासनगरात अवैध बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Published: September 15, 2023 01:10 PM2023-09-15T13:10:21+5:302023-09-15T13:10:31+5:30

 उल्हासनगर कॅम्प नं-३, जवहात हॉटेल समोरील सुभाष कॉलनी येथे वाढीव अवैध बांधकाम झाले.

A case has been registered under MRTP for illegal construction in Ulhasnagar | उल्हासनगरात अवैध बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल

उल्हासनगरात अवैध बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल

googlenewsNext

उल्हासनगर : कॅम्प नं-३, जवाहर हॉटेल समोरील सुभाष कॉलनी येथे अवैध बांधकाम करणाऱ्यावर महापालिका प्रभाग अधिकारी जेठानंद करमचंदानी यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल झाला. शहरात अवैध बांधकामाचा सुळसुळाट झाला असून प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी होत आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-३, जवहात हॉटेल समोरील सुभाष कॉलनी येथे वाढीव अवैध बांधकाम झाले. प्रभारी प्रभाग अधिकारी जेठानंद करमचंदानी यांच्याकडे तक्रारी गेल्यानंतर, त्यांनी गुरवारी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात वाढीव अवैध बांधकाम केल्या प्रकरणी मायकल इमोहीन याच्या विरोधात तक्रार दाखल केली. मध्यवर्ती पोलिसांनी मायकल ईमोहीन याच्या विरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाढीव अवैध बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर पाडकाम कारवाईची मागणी होत आहे.

 प्रभारी प्रभाग समिती क्रं-२ च्या प्रभाग अधिकारी पदाचा पदभार असलेले जेठानंद करमचंदानी यांच्याकडे वर्ग-१ चे करनिर्धारक संकलक पदाचाही प्रभारी पदभार आहे. दोन महत्त्वाचा पदाचा पदभार त्यांच्याकडे असल्याने, ते या दोन्ही पदाला न्याय देवू शकत नाही. अशी टीका होत आहे. लिपिक दर्जाचे असलेले करमचंदानी यांच्याकडून एक पदाचा पदभार काढून घेण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. महापालिकेतील काही मोजक्या कर्मचाऱ्यांवर महत्वाच्या पदाचा पदभार दिल्याने, महापालिका प्रशासनावर टीका होत आहे

Web Title: A case has been registered under MRTP for illegal construction in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.