ठाणेकरांना ‘सांधे दुखीच्या वेदना’ मोफत मेगा आराेग्य शिबिरात दूर करण्याची संधी
By सुरेश लोखंडे | Published: November 17, 2023 05:58 PM2023-11-17T17:58:04+5:302023-11-17T17:58:20+5:30
या माेफत आराेग्य शिबिरात विविध सांधेदुखी वेदना, फ्रोजन शोल्डर, टाच दुखी त्रस्त रुग्णांना तात्काल वेदनाशामक उपचार करण्यात येणार आहे.
ठाणे : येथील आरोग्य भारती आणि आयुर्वेदिक चिकित्सालय आरोग्यधाम यांच्याकडून राष्ट्रीय तात्काल वेदना व्यवस्थापन परिषदेच्या निमित्ताने ठाणे येथे मोफत वेदना निवारण उपचार शिबीर आयाेजित केले आहे. २५ व २६ या दाेन दिवशीय शिबराचा लाभ घेउन सांधे दुखीच्या वेतनांसह फ्राेजन शाेल्डर, टाच दूखी दूर करण्याची संधी ठाणेकरांना या शिबिराव्दारे मिळणार आहे, असे डाॅ. उदय कुलकर्णी यांनी लाेकमतला सांगितले.
या माेफत आराेग्य शिबिरात विविध सांधेदुखी वेदना, फ्रोजन शोल्डर, टाच दुखी त्रस्त रुग्णांना तात्काल वेदनाशामक उपचार करण्यात येणार आहे. येथील ठाणे कॉलेज कॅम्पस ,येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत उपचार माेफत करण्यात येणार असल्याचे डाॅ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
या शिबिरासाठी तात्काल वेदनाशामक उपचारासाठी अनुभवी डॉक्टरांचे पथक उपस्थित राहणार आहे. रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि शिबिरात सहभागी हाेण्याचे आवाहन डाॅ. कुलकर्णी यांनी केले आहे. रुग्णांना वेदनांपासून दीर्घकालीन मुक्ती माेफत मिळवून दिली जात आहे, याच्या अधीक माहितीसाठी ९९६९५२७३६२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.