पोलिस कर्मचाऱ्याविरोधात लाच मागितल्याचा गुन्हा, ठाणे लाचलुचपतची कारवाई

By प्रशांत माने | Published: September 2, 2022 07:31 PM2022-09-02T19:31:44+5:302022-09-02T19:31:54+5:30

डोंबिवली:  मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्हयातील प्रकरणात वरीष्ठांनी सहकार्य केले आहे आणि ते यापुढेही करतील. त्यासाठी ४० ...

A crime of demanding bribe against a police officer, Thane bribery action | पोलिस कर्मचाऱ्याविरोधात लाच मागितल्याचा गुन्हा, ठाणे लाचलुचपतची कारवाई

पोलिस कर्मचाऱ्याविरोधात लाच मागितल्याचा गुन्हा, ठाणे लाचलुचपतची कारवाई

Next

डोंबिवली:  मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्हयातील प्रकरणात वरीष्ठांनी सहकार्य केले आहे आणि ते यापुढेही करतील. त्यासाठी ४० हजार रूपये दयावे लागतील अशी मागणी करणा-या पोलिस नाईक नितीन राठोड विरोधात त्याच मानपाडा पोलिस ठाण्यात लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक  पथकाचे पोलिस निरिक्षक सुरेश चोपडे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

राठोड हा मानपाडा पोलीस ठाण्यातील एका पोलिस उपनिरिक्षकाचा लिपिक  आहे. या उपनिरिक्षकाकडे एक गुन्हा तपासासाठी आहे. या गुन्हयातील आरोपीला आणि त्याच्या पत्नीला आतापर्यंत सहकार्य केले आहे. ते यापुढेही सहकार्य करतील असे राठोड याने या प्रकरणातील आरोपीला सांगितले. मात्र त्यासाठी ५० हजार  रुपये दयावे लागतील, असेही त्याने सांगितले.

या पैशांसाठी राठोड याने आरोपीकडे तगादा लावला होता. त्यामुळे आरोपीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक चोपडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक शहानिशा केली. चौकशी दरम्यान राठोड याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली आणि तडजोडीअंती ४० हजार रुपये देण्याचे ठरले. तपासात लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने राठोड विरोधात  मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: A crime of demanding bribe against a police officer, Thane bribery action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.