बापरे! चायनीज खाताना ग्राहकाला आढळली उंदराची विष्टा; भाईंदरमधील संतापजनक प्रकार
By धीरज परब | Published: March 30, 2023 04:29 PM2023-03-30T16:29:05+5:302023-03-30T16:29:44+5:30
अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
मीरारोड - भाईंदर पश्चिमेस फाटक मार्गावर असलेल्या एका चायनीज हॉटेलात जेवण्यास गेलेल्या ग्राहकाला जेवणात उंदराची लेंडी आढळल्याची तक्रार त्याने अन्न व औषध प्रशासनाला केली आहे . प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने लोकांच्या आरोग्य व जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एसपी चायनीज पॉईंट ह्या हॉटेलात विजय मोरे हे सोमवारी दुपारी जेवणासाठी गेले होते . त्यावेळी त्यांनी मागवलेल्या जेवणात उंदराची लेंडी आढळली . त्याची छायाचित्रे घेऊन मोरे यांनी अन्न व औषध प्रशासना कडे तक्रार केली आहे . शिवाय सदर हॉटेल मध्ये तेल आदी पदार्थांचा दर्जा व स्वच्छते बाबत मोरे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण करत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्ती मुळे नियमित तपासणी व कार्यवाही केली जात नाही.
तक्रार करून देखील तातडीने येऊन पाहणी न करता केवळ कार्यवाहीचे आश्वासन देऊन पुरावे नष्ट करू दिले जात आहेत असा आरोप त्यांनी केला . तर सदर चायनीज हॉटेल शी संपर्क साधला असता ग्राहकाची तशी तक्रार असली तो करपलेला भात असल्याचे सांगण्यात आले.