भिवंडीत इमारतीची धोकादायक संरक्षक भिंत कोसळली,सुदैवाने जीवितहानी नाही
By नितीन पंडित | Updated: June 22, 2024 14:00 IST2024-06-22T14:00:16+5:302024-06-22T14:00:26+5:30
विशेष म्हणजे या धोकादायक संरक्षक भिंती लगत रहदारीचा रस्ता आहे.व जवळच पालिकेची शाळा क्रमांक ७० असून या शाळेतील विद्यार्थी व स्थानिक नागरिक या भिंती लगतच्या रस्त्याचा पायवाट म्हणून वापर करतात.

भिवंडीत इमारतीची धोकादायक संरक्षक भिंत कोसळली,सुदैवाने जीवितहानी नाही
भिवंडी: भिवंडी महानगरपालिका हद्दीत गुलजार नगर चव्हाण कॉलनी या भागात एका इमारती च्या कंपाऊंड ची संरक्षक भिंत पहाटेच्या सुमारास कोसळली. पहाटेची वेळ असल्याने रहदारी नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
विशेष म्हणजे या धोकादायक संरक्षक भिंती लगत रहदारीचा रस्ता आहे.व जवळच पालिकेची शाळा क्रमांक ७० असून या शाळेतील विद्यार्थी व स्थानिक नागरिक या भिंती लगतच्या रस्त्याचा पायवाट म्हणून वापर करतात.जर ही भिंत दिवसा पडली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्या नंतर पालिका आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही संपूर्ण धोकादायक भिंत पाडून टाकली आहे.