ऐन दिवाळीत शाखेवरून जोरदार राडा; शाखेची कागदपत्रे आमच्याकडे, दोन्ही गटांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 06:27 AM2023-11-12T06:27:21+5:302023-11-12T06:28:30+5:30
कलानगर वापस जाओ, शिंदे गटाची घोषणाबाजी
ठाणे-मुंबा: मुंब्रा येथील उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली शिवसेना शाखा आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ताब्यात घेऊन जमीनदोस्त केल्याने या शाखेच्या जागेला भेट देण्याकरिता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शनिवारी दिवाळीत नेत्यांसह शिवसैनिकांचा फौजफाटा घेऊन मुंबईहून दाखल झ झाले. शिंदे गटाच्या कार्यकत्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत 'कलानगर वापस चले जाओ', अशी घोषणाबाजी केली. यामुळे सुमारे तासभर मुंब्रा परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे दिवाळीत शिमगोत्सवाचे चित्र महाराष्ट्राने पाहिले.
शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ठाकरे यांना पोलिसांनी शाखेपाशी जाण्यास मज्जाव केला व कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर ठाकरे माघारी फिरले. शिंदे गटाने आपला विजय झाल्याचा जल्लोष केला. मुंब्रा अग्निशमन केंद्रापाशी ठाकरे यांनी भाषण करून शाखा ताब्यात घेण्याबाबत नाराजी प्रकट केली. यावेळी संजय राऊत, आ. अनिल परब, अनिल देसाई, खा. अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर, अजय चौधरी, सुनील शिंदे, ठाण्याचे खा. राजन विचारे व मुंब्र्याचे आ. जितेंद्र आव्हाड हेही ठाण्यातील कार्यकर्त्यांसह होते.
वाद काय आहे?
१ मुब्यातील ही शाखा २ नोव्हेंबरपर्यंत उद्धव ठाकरे गटाच्या ताब्यात होती. ठाकरे गटाचे शहरप्रमुख व माजी नगरसेवक विजय कदम हे दररोज शाखेत बसत होते. २२ नोव्हेंबर : शिंदे गटाचे राजन किणी व त्यांचे समर्थक तेथे आले. त्यांनी कदम यांना शाखेबाहेर काढत शाखेचा ताबा घेतला. त्याच रात्री जेसीबीच्या मदतीने शाखा जमीनदोस्त केली. 3 नवीन शाखेची उभारणी करण्याकरिता दोन दिवसांपूर्वी गोपाळ लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन केले. सध्या शाखेच्या जागेवर कंटेनर आणून ठेवला असून, त्यावर शिदे गटाने आपला बॅनर लावला आहे. कंटेनरच्या मागे नव्या शाखेचे बांधकाम सुरु झाले.
बुलडोझरने शिवसेनेची शाखा पाडली, पण खरा बुलडोझर घेऊन मी मुल्यातील रस्त्यावर आलो आहे. आपले बॅनर फाडल्याचे मला कळले. मात्र, निवडणुका येऊ द्या, मग दाखवतो, असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिला. पोलिसांनी शाखाचोराचे रक्षण केले. प्रशासन हतबल झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आज येथे काही विपरित घडले असते, तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. पोलिस बाजूला करून भिडा, आमची तयारी आहे. या गद्दारांना येणाऱ्या सर्व निवडणुकांत पराभूत करा. -उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख,
शिवसेना (ठाकरे गट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक शिवसैनिकांना गुड म्हणता, मग ठाण्यात शिवसेना कोणी वाढविली? उद्धव ठाकरे हे तर घरातून बाहेर पडत नव्हते. पक्ष उभे करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी हेच शिवसैनिक रस्त्यावर उतरत होते. स्व. आनंद दिघे यांनी ठाण्यात शिवसेना उभी केली व एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मोठी केली. त्याच ठाण्यातील शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी गुड म्हणणे दुर्देवी आहे. मीनाक्षी शिंदे, माजी महापौर, शिवसेना (एकनाथ शिंदे गट