उल्हासनगरात डॉक्टरसह भावाला टोळक्याकडून मारहाण
By सदानंद नाईक | Updated: June 21, 2024 17:41 IST2024-06-21T17:41:43+5:302024-06-21T17:41:59+5:30
उल्हासनगरहुन अंबरनाथकडे गुरवारी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान डॉ सागर ज्योतिराम दुतोंडे हे भाऊ अजयसह जात होते. त्यावेळी दोन तरुण रस्त्यावरून स्कुटर आडवी-तिडवी चालवीत जात होते.

उल्हासनगरात डॉक्टरसह भावाला टोळक्याकडून मारहाण
उल्हासनगर : स्कुटर गाडी रस्त्यावरून नीट चालव असे बोलल्याच्या रागातून डॉक्टरसह भावाला एका टोळक्याने मारहाण केल्याची घटना गुरवारी रात्री घडली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगरहुन अंबरनाथकडे गुरवारी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान डॉ सागर ज्योतिराम दुतोंडे हे भाऊ अजयसह जात होते. त्यावेळी दोन तरुण रस्त्यावरून स्कुटर आडवी-तिडवी चालवीत जात होते. डॉ सागर दुतोंडे यांनी त्यांना गाडी चालविण्याबाबत हटकले. याचा राग तरुणांना येऊन त्यांनी डॉक्टरच्या वाहनासमोर गाडी आडवी करून शिवीगाळ सुरू केली. तसेच फोन करून साथीदारांना बोलावून घेतले. काही मिनिटात १० ते १५ जणांचे टोळके येऊन त्यांनी लाकडी दांडके, बॅट व दगडाने डॉक्टरसह भावाला मारहाण करून जखमी केले. या हल्ल्याचा सर्वस्तरातून निषेध होत असून टोळक्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.