भिवंडीत मेण व केमिकलच्या गोदामाला भीषण आग
By नितीन पंडित | Published: March 8, 2023 05:51 PM2023-03-08T17:51:53+5:302023-03-08T17:53:43+5:30
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी आग इतकी भयंकर होती की आगीचे लोळ सर्वदूर पसरले होते.
भिवंडी - फर्निचर लाकडाला पॉलिश करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकल व मेणबत्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या मेणाचा साठा असलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी पूर्णा येथील पद्मिनी कॉम्प्लेक्स येथील एका गोदामात घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी आग इतकी भयंकर होती की आगीचे लोळ सर्वदूर पसरले होते.
पुर्णा ग्रामपंचायत हद्दीत पद्मिनी कॉन्प्लेक्स येथील गोदामात लाकडाला पॉलिसी करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल व मेणबत्ती बनविण्याच्या मेणाचा मोठा साठा असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने संपूर्ण गोदाम जाळून खाक झाले आहे.गोदामांच्या पहिल्या मजल्या वरील पत्र्याच्या गोदामात साठवलेले मंडप डेकोरेशन साहित्य देखील या आगीत भस्मसात झाले आहे.घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल होत त्यांनी सुमारे तीन तासांनी या आगीवर नियंत्रण मिळविले आहे.या आगीत एका गॅस सिलेंडरचा देखील स्फोट झाला असल्याची माहिती मिळाली असून ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसून या आगीची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.