मुब्र्यात बंद घरामध्ये लागली आग, घरातील साहित्य जळून खाक
By कुमार बडदे | Published: May 28, 2024 08:44 AM2024-05-28T08:44:08+5:302024-05-28T08:44:42+5:30
आग लागल्याची माहिती मिळताच वीज वितरण करणाऱ्या खाजगी कंपनीचे कर्मचारी आणि मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अथक प्रयत्नानी दोन फायर आणि एक रेस्क्यू वाहनांच्या मदतीने मध्यरात्री दोन वाजून १० मिनिटांच्या सुमारास आग पूर्णपणे विझवली.
मुंब्रा : येथील एका बंद घरामध्ये लागलेल्या आगीत घरातील विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मुंब्रा शहरातील कौसा भागातील रशिद कंपाउंड परीसरातील नसीम अपार्टमेंन्ट या तळ अधिक चार मजली इमारतीच्या बी विंग मधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या रुम नंबर ३०६ मध्ये मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. सध्या ही रुम बंद आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच वीज वितरण करणाऱ्या खाजगी कंपनीचे कर्मचारी आणि मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अथक प्रयत्नानी दोन फायर आणि एक रेस्क्यू वाहनांच्या मदतीने मध्यरात्री दोन वाजून १० मिनिटांच्या सुमारास आग पूर्णपणे विझवली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र घरातील बेड, पंखा, कपडे, कपाट, वातानुकुलित (एसी)यंत्र, टिव्हि, विद्युत वायरींग आदि साहित्य जळाले असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.