नवी मुंबईतून सव्वा कोटींचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त; एफडीएची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Published: October 20, 2022 07:25 PM2022-10-20T19:25:26+5:302022-10-20T19:30:29+5:30

नवी मुंबईतून सव्वा कोटींचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. 

A food stock worth half a crore has been seized from Navi Mumbai | नवी मुंबईतून सव्वा कोटींचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त; एफडीएची कारवाई

नवी मुंबईतून सव्वा कोटींचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त; एफडीएची कारवाई

googlenewsNext

ठाणे : नवी मुंबईतील वाशी, तुर्भे आणि बेलापूर रोड अशा चार वेगवेगळया ठिकाणी बुधवारी केलेल्या तपासणीत ठाणे अन्न व औषध प्रशासनाने सुमारे एक कोटी २९ लाखांच्या खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये ३७ लाखांच्या खाद्यतेलासह इतर मसाल्यांच्या पदार्थांचा समावेश आहे. याप्रकरणी चार व्यापाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कोकण विभागागीय सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी गुरुवारी दिली. 

सणासुदीच्या काळात अन्न पदार्थांची मोठया प्रमाणात मागणी वाढत असल्याने असल्याने त्यात भेसळ होण्याची अन्न पदार्थांचा दर्जा तसेच गुणवत्ता घसरण्याची भीती अधिक असते. दिवाळीच्या सणात प्रामुख्याने सामान्य जनतेला भेसळमुक्त सकस आणि चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ही विशेष मोहिम हाती घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील वाशी, तुर्भे येथील मेसर्स शिवशक्ती इंटरप्राईजेस, या खाद्यतेल उत्पादक - पॅकर येथे केलेल्या तपासणीत ३७ लाख १० हजार १८६ रुपये किंमतीचा २३ हजार ५४७  किलोग्रॅम रिफाइंड सोयाबीन तेल, रिफाइंड पामोलिन तेल, रिफाइंड राईस ब्रान तेल व रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल असा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे.

तर बेलापूर रोड येथील मेसर्स कुसुमचंद्र आणि कंपनीतून एकूण सहा लाख ११ हजार रुपये किंमतीची तीन  हजार ८४४ किलो ग्रॅम हळद पावडर, मिक्स मसाला आणि गरम मसाला जप्त केल आहे. त्याचप्रमाणे तुर्भे ,एपीएमसी मार्केट, फेज दोन, येथील मेसर्स राज एंटरप्राइज येथून ५५ लाख १६ हजार २६० रुपये किंमतीचा ११ हजार २६९ किलो मिरची पावडर आणि हळद पावडरचा  साठा जप्त झाला. याशिवाय वाशीतील एपीएमसी मार्केट फेज दोन येथील मेसर्स कुसुमचंद्र दामोदर आणि कंपनीतून २५ लाख ५ हजार १५० रुपयांचा ९ हजार १८६  किलोग्राम वजनाची मिरची पावडर, हळद पावडर व धनिया पावडर याचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे कोकण विभाग सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  कोकण विभागातील सहाय्यक आयुक्त (अन्न) धनंजय काडगे, अशोक पारधी तसेच अन्न सुरक्षा अधिकारी कांबळे, बडे, ताकाटे आणि विश्वजीत शिंदे आदींच्या पथकाने केली. निर्भेळ, सकस अन्न पदार्थ विक्रीसाठी भेसळीचे पदार्थ विक्री करणाºयांविरुद्धची कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याचे सह आयुक्त देशमुख यांनी लोकमतला सांगितले.

 

Web Title: A food stock worth half a crore has been seized from Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.