गाई चोरून नेणाऱ्या चार चाकी वाहनाची दुचाकीला दिली धडक; दोन महिला गंभीर जखमी
By पंकज पाटील | Updated: August 18, 2023 15:21 IST2023-08-18T15:20:58+5:302023-08-18T15:21:56+5:30
अंबरनाथमध्ये गोवंशाची चोरी करण्याचे प्रकार अनेक वेळा समोर आलेले असताना देखील पोलीस प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

गाई चोरून नेणाऱ्या चार चाकी वाहनाची दुचाकीला दिली धडक; दोन महिला गंभीर जखमी
अंबरनाथ : शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान दोन गाई चोरून नेणाऱ्या एका चार चाकी गाडीने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना धडक दिली आहे. या दुचाकीवरून जाणाऱ्या दोन्हीही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर मुंबईच्या रुग्णालयात उच्चार सुरू करण्यात आले आहेत.
अंबरनाथमध्ये गोवंशाची चोरी करण्याचे प्रकार अनेक वेळा समोर आलेले असताना देखील पोलीस प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
आज सकाळी घडलेल्या या अपघातात गाय चोरणाऱ्यांचा निर्दयीपणा समोर आला असून दोन महिलांना मृत्यूच्या दारात नेण्याचे काम या चोरट्याने केले आहे. अपघात घडल्यानंतर गाय चोरणाऱ्यांनी त्यांची कार देखील नगरपालिका कार्यालयाजवळ सोडून पळ काढला आहे. नेमकी ही कार आहे कोणाची आणि त्याचा संबंध गोवंशाची हत्या करणाऱ्यांसोबत आहेत की नाही याचा तपास पोलीस करीत आहेत.
पहाटे अपघाताची घटना घडल्यानंतर नागरिकांनी जखमी दोन्ही महिलांना रुग्णालयात घालवले तर दुसरीकडे या कारचा फाटला करण्याचा प्रयत्न केला मात्र या काय चोरांनी नगरपालिका कार्यालयासमोर गाडी सोडून पळ काढला.