मित्रानेच केला मित्राचा घात: बिअरची बॉटल फोडून मानेवर केला वार
By पंकज पाटील | Updated: February 19, 2024 19:42 IST2024-02-19T19:42:18+5:302024-02-19T19:42:43+5:30
जॅक्सन याने टेबलावर असलेली बियरची बॉटल फोडत राजेश यांच्या मानेवर वार केले.

मित्रानेच केला मित्राचा घात: बिअरची बॉटल फोडून मानेवर केला वार
अंबरनाथ:अंबरनाथच्या पश्चिम भागात यशोदा हॉटेलमध्ये बसलेल्या दोघा मित्रांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला आणि या वादात एका मित्राने बियरची बॉटल फोडून आपल्याच मित्रावर जीवघेणा हल्ला करत त्याच्या मानेवर वार केले. अंबरनाथच्या पश्चिम भागात असलेल्या हॉटेलमध्ये राजेश राजगोपालन आपला मित्र जॅक्सन याच्यासोबत जेवणासाठी बसला होता. जेवताना जॅक्सन हा दारू पीत असल्याने त्या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला. या वादानंतर जॅक्सन याने टेबलावर असलेली बियरची बॉटल फोडत राजेश यांच्या मानेवर वार केले.
बिअरची फुटलेली बॉटल मानेमध्ये घुसल्याने राजेश हे गंभीर जखमी झाले. त्यांना सुरुवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लागलीच ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्रावर केलेला हा जीवघेणा हल्ला नेमक्या कोणत्या वादातून घडला याचा पोलीस तपास करीत आहेत.