उल्हासनगरात दरोड्याचा तयारीत असलेली टोळी जेरबंद, सुरे, चाकू, मिर्ची पावडर हस्तगत

By सदानंद नाईक | Published: June 8, 2023 12:10 PM2023-06-08T12:10:32+5:302023-06-08T12:10:46+5:30

आरोपीला न्यायालयाने ९ जून पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. 

A gang preparing for a robbery in Ulhasnagar jail seizes knives chili powder | उल्हासनगरात दरोड्याचा तयारीत असलेली टोळी जेरबंद, सुरे, चाकू, मिर्ची पावडर हस्तगत

उल्हासनगरात दरोड्याचा तयारीत असलेली टोळी जेरबंद, सुरे, चाकू, मिर्ची पावडर हस्तगत

googlenewsNext

उल्हासनगर : कॅम्प नं-४ स्टेशन परिसरातील अल्बर्ट पार्क येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांच्या टोळीला विठ्ठलवाडी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून सुरे, चाकू, मोबाईल, मिर्ची पावडर हस्तगत केली असून न्यायालयाने ९ जून पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. 

उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातील अल्बर्ट पार्किंग येथे ५ जून रोजी मध्यरात्री दिड वाजण्याच्या दरम्यान रिक्षात घातक शस्त्रासह बसलेली टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना मिळाली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकाला घटनास्थळी पाठवून दरोड्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांच्या टोळीला जेरबंद केले. तर काही जण पळून गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रोहित आनंत गायकवाड, तेजस थापा, आकाश कुष्णा सिंग, अतिष अंकुश कांबळे, प्रेम श्याम चंदे व प्रथमेश सुरेश साळुंके याना अटक करून त्यांच्याकडून ६ सुरे व चाकू, मोबाईल, मिरची पावडरसह अन्य साहित्य जप्त केले. त्यांना न्यायालयाने ९ जून पर्यंत पोलीस कस्टडी सुनावल्याची माहिती पोलीस अधिकारी गायकवाड यांनी दिली.

 या टोळीतील जेरबंद झालेले सर्वच गुन्हेगार पोलीस रेकोर्डवरील असून तेजस थापा याला यापूर्वी अनेकदा अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस चौकशीत टोळीने यापूर्वी कुठे चोरी, दरोडा टाकला का? ते कुठे दरोडा टाकण्याचा तयारीत होते का?. आदींची माहिती मिळणार असल्याचे संकेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिले आहे.

Web Title: A gang preparing for a robbery in Ulhasnagar jail seizes knives chili powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.