रिक्षा चालकाकडून तरुणीचा विनयभंग, ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील घटना

By अजित मांडके | Published: October 14, 2022 07:01 PM2022-10-14T19:01:39+5:302022-10-14T19:01:56+5:30

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील बाजारपेठेत एका २१ वर्षीय मुलीचा रिक्षा चालकाने वियनभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला आहे.

A girl was molested by a rickshaw driver, an incident in Thane railway station area | रिक्षा चालकाकडून तरुणीचा विनयभंग, ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील घटना

रिक्षा चालकाकडून तरुणीचा विनयभंग, ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील घटना

googlenewsNext

ठाणे:ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील बाजारपेठेत एका २१ वर्षीय मुलीचा रिक्षा चालकाने वियनभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. विनयभंग करणाऱ्या त्या रीक्षाचालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न देखील तरुणीने केला. मात्र रिक्षाचालकाने तिला फरफटत नेले यामध्ये तरुणीला दुखापत झाली आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार रिक्षा चालक चा शोध पोलीस घेत आहेत.

शुक्रवारी सकाळी ७ वाजता ही तरुणी बाजरपेठेत पायी जात होती. त्याचवेळी एक रिक्षा चालक त्याची रिक्षा घेऊन  जात होता. या रिक्षा चालकाने तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव केले. या प्रकारानंतर तरूणीने धाडस दाखवित रिक्षा चालकाला जाब विचारत तसेच त्याला रिक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

परंतु रिक्षा चालकाने रिक्षा सुरु केली. तसेच त्याने तरुणीला फरफटत काही अंतर पुढे नेले. तरुणीच्या हाताला दुखापत झाल्याने ती रस्तात पडली. त्यानंतर रिक्षा चालक स्थानकाच्या दिशेने फरार झाला.दरम्यान, घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणाची तक्रार तिने ठाणेनगर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीच्या आधारे रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A girl was molested by a rickshaw driver, an incident in Thane railway station area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.