भाईंदर मध्ये कांदळवनची कटर ने निर्घृण कत्तल ; झाडांना कट मारून रसायन वापरत लावल्या चिकटपट्ट्या

By धीरज परब | Published: May 21, 2024 03:42 PM2024-05-21T15:42:27+5:302024-05-21T15:42:35+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने तसेच कायद्या नुसार कांदळवन जे संरक्षित आहे. तसेच कांदळवनच्या ५० मीटर बफर झोन मध्ये सुद्धा भराव , बांधकामे करता येत नाहीत .

A gruesome slaughter of Kandalvan by cutters in Bhayandar; Adhesive tapes applied by cutting trees and using chemicals | भाईंदर मध्ये कांदळवनची कटर ने निर्घृण कत्तल ; झाडांना कट मारून रसायन वापरत लावल्या चिकटपट्ट्या

भाईंदर मध्ये कांदळवनची कटर ने निर्घृण कत्तल ; झाडांना कट मारून रसायन वापरत लावल्या चिकटपट्ट्या

मीरारोड - मुंबई उच्च न्यायालयाने कांदळवन संरक्षणाचे आदेश देऊन देखील भाईंदर मध्ये मात्र इंद्रलोक भागात कांदळवनची निर्घृण कत्तल केल्याचे उघडकीस आले आहे . या ठिकाणी कांदळवन वर रासायनिक विषप्रयोग केल्याचे देखील पहिल्यांदा आढळून आले आहे . त्यामुळे जागरूक पर्यावरण प्रेमी नागरिकांनी संताप व्यक्त करत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यासह कांदळवन संरक्षणाची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकारी - कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे .  

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने तसेच कायद्या नुसार कांदळवन जे संरक्षित आहे. तसेच कांदळवनच्या ५० मीटर बफर झोन मध्ये सुद्धा भराव , बांधकामे करता येत नाहीत . न्यायालयाच्या आदेशाने कांदळवन संरक्षण समिती असून पोलीस , महापालिका , महसूल विभाग, कांदळवन विभाग आदींवर कांदळवन संरक्षणाची जबाबदारी निश्चित केलेली आहे . 

तसे असताना भाईंदर पूर्वेला इंद्रलोक पोलीस चौकी, राम अनंत इमारत व गावदेवी चाळच्या लगत पूर्वीपासून असलेल्या कांदळवनचे  जंगल सातत्याने नष्ट केले जात आहे . ह्या ठिकाणी भराव करून बेकायदा मार्बल दुकान पासून झोपड्या, गॅरेज , चाळ , इमारत आदी नियमबाह्य उभारले . येथे सर्रास कचरा , डेब्रिस आदींचा बेकायदा भराव करून अनेक मोठी झाडे मारली गेली आहेत . येथील भरतीच्या पाण्याचे मार्ग बंद केले गेले आहेत . लघुशंका करणाऱ्यांचा तसेच व्यसनींचा अड्डा बनला आहे .  

ह्या भागातील कांदळवन ऱ्हास आणि कांदळवन क्षेत्रात होणारा भराव - बांधकाम आदी प्रकरणी अनेकवेळा तक्रारी झाल्या असून कांदळवन समिती सह महसूल , कांदळवन विभाग आदींनी स्थळपाहणी केलेल्या आहेत . परंतु वेळीच गुन्हा दाखल करण्यासह कांदळवन संरक्षणासाठी उपाययोजना केली गेल्या नाहीत . न्यायालयाच्या आदेशा नुसार  कचरा - भराव , बांधकामे आदी हटवून भरतीच्या पाण्याचा मार्ग मोकळा केला गेला नाही .  

त्यातूनच सदर जमीन खाजगी असून जमीन मालक आणि विकासकांच्या डोळ्यात भरलेली असल्याने येथील असंख्य मोठी कांदळवन ची झाडे कटर ने कापून तर अनेक झाडांच्या बुध्यांना कट मारून त्यावर  रसायन वापरून चिकटपट्टी लावण्यात आली व झाडांची कत्तल केली गेली आहे.  कांदळवनची कटकारस्थानाने कत्तल केल्याचे निदर्शनास आल्यावर गो ग्रीन फाउंडेशनचे वीरभद्र कोनापुरे तसेच अन्य पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तात्काळ महसूल , कांदळवन व पोलीस विभागास तक्रार केली . घटनास्थळी संबंधित विभागांनी शनिवारी पाहणी केली असून मोठ्या प्रमाणात कत्तल केलेल्या कांदळवनची आणि परिसराची पाहणी केली .  

ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सदर प्रकारची दखल घेत कारवाईचे आदेश अपर तहसीलदार यांना दिले आहेत . झाडांना कट मारून लावलेल्या चिकटपट्ट्या , रसायन व झाडांचे नमुने कांदळवन विभागाने घेतले असून ते तपासणी साठी पाठवले जाणार आहेत असे वनक्षेत्रपाल विक्रांत खाडे यांनी सांगितले .  सदर परिसराच्या तक्रारी व स्थळपाहणी होऊन देखील वेळीच गुन्हे दाखल केले गेले नाहीत . भराव - कचरा व बांधकामे हटवून भरतीच्या पाण्याचे मार्ग मोकळे केले गेले नाहीत . 

त्यामुळे संबंधित विकासक आणि जमीन मालक यांनी कारस्थान करून कांदळवनची कत्तल केल्याचा आरोप गो ग्रीन फाउंडेशनचे वीरभद्र कोनापुरे व साबीर सय्यद ,  फॉर फ्युचरचे हर्षद ढगे आदींनी केला आहे . या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करा, न्यायालयाच्या आदेशा नुसार  येथील बेकायदा भराव  - बांधकामे तात्काळ हटवा . कांदळवन लागवड  करा . बेजबाबदार अधिकारी - कर्मचारी यांच्यावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे .    

Web Title: A gruesome slaughter of Kandalvan by cutters in Bhayandar; Adhesive tapes applied by cutting trees and using chemicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.