भाईंदरच्या खाडीत महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान बुडाला
By धीरज परब | Published: July 16, 2023 06:07 PM2023-07-16T18:07:13+5:302023-07-16T18:07:47+5:30
कांदळवन संरक्षणासाठी भाईंदर पश्चिम खाडी किनारी बांधलेल्या जेट्टी येथे रमेश पाटील रा. कुर्ला हे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान कांदळवन विभागा मार्फत तैनात होते.
मीरारोड भाईंदर पश्चिम येथील जेटीवरून पडून महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान खाडीत बुडाल्याची घटना रविवार १६ जुलै रोजी दुपारी घडली आहे.
या भागातील कांदळवन संरक्षणासाठी भाईंदर पश्चिम खाडी किनारी बांधलेल्या जेट्टी येथे रमेश पाटील रा. कुर्ला हे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान कांदळवन विभागा मार्फत तैनात होते.
दुपारी तीन ते चारच्या दरम्यान जेट्टीवर गेलेले पाटील हे खाडीच्या प्रवाहात पडले व वाहून गेले.
सदर घटनेची माहिती मिळताच मीरा-भाईंदर महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान भाईंदर पोलीस यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने पाटील यांचा शोध चालवला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील हे पोहण्यासाठी खाडीत उतरले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण पाटील यांचे कपडे जेट्टीवर सापडले आहेत . तर त्यांच्या सोबत आणखी दोघे जण होते असे सांगितले जाते. पावसाळ्यात खाडीतील प्रवाहाला प्रचंड वेग असतो. त्यामुळे पाटील यांना शोधणे अवघड बनले आहे.