ज्यूंच्या धर्मस्थळाला धमकी देणारा मेल अमेरिकेतून ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 09:53 AM2023-12-31T09:53:33+5:302023-12-31T09:54:01+5:30
हा मेल अमेरिकन सर्व्हरमधून आल्याच्या वृत्ताला ठाणे शहरचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी दुजोरा दिला आहे.
ठाणे : सिनेगॉग या ज्यूंच्या धार्मिकस्थळाला स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल हा अमेरिकेशी संबंधित संगणक सर्व्हरमधून आला आहे. मात्र, भारतात बसून एखाद्या ॲप्लिकेशनद्वारे असा मेल पाठवता येत असल्याने धमकीचा मेल पाठविणारी ती खोडसाळ व्यक्ती भारतीय आहे की परदेशी, याची खातरजमा झालेली नाही. हा मेल अमेरिकन सर्व्हरमधून आल्याच्या वृत्ताला ठाणे शहरचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी दुजोरा दिला आहे.
काय घडले होते....
- सुमारे दीडशे वर्षे जुन्या असलेल्या पोर्तुगीजकालीन सिनेगॉग या ज्यूंच्या धार्मिकस्थळाला स्फोटकांनी उडवून देण्याच्या धमकीचा मेल २८ डिसेंबर २०२३ रोजी आला होता.
- ही माहिती प्रार्थनास्थळाच्या विश्वस्तांनी नौपाडा पोलिसांना दिली.
- त्यानंतर ठाणे बॉम्ब शोधक-नाशक पथकाने या धार्मिकस्थळासह संपूर्ण परिसर निर्मनुष्य करून तीन ते साडेतास तास तपासणी केली.
- मात्र, कोणतीही संशयित वस्तू किंवा बॉम्ब आढळला नाही.