अंबरनाथमध्ये एमआयडीसीत एका कंपनीला भीषण आग
By पंकज पाटील | Published: January 24, 2024 07:47 PM2024-01-24T19:47:40+5:302024-01-24T19:55:59+5:30
कुलिंगसाठी तयार करण्यात येणाऱ्या टाक्यांचे काम या ठिकाणी केले जात होते.
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका इंजिनिअरिंग कंपनीला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान आनंदनगर एमआयडीसीमधील कॅनरा इंजिनिअरिंग या कंपनीत मोठी आग लागली.
कुलिंगसाठी तयार करण्यात येणाऱ्या टाक्यांचे काम या ठिकाणी केले जात होते. या टाक्या बनवण्यासाठी आणण्यात आलेल्या कच्च्या मालाला ही आग लागली. अंबरनाथच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या आगीत कंपनीने मोठे नुकसान झाले.
गेल्याच आठवड्यात बदलापुरातील एमआयडीसीमध्ये देखील एका केमिकल कंपनीला आग लागली होती. त्यानंतर पुन्हा अंबरनाथमध्ये इंजिनिअरिंग कंपनीला आग लागल्याने या आगीचे सत्र आता थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.