नवऱ्या घरात चोरी करणाऱ्या विवाहितेला प्रियकरासह अखेर सहा वर्षांनी अटक

By अजित मांडके | Published: February 25, 2023 06:48 PM2023-02-25T18:48:21+5:302023-02-25T18:48:51+5:30

पतीच्या घरात त्याचे वडीलोपार्जित ५५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून प्रियकरासोबत पळणाऱ्या विवाहित महिलेला त्याच्या प्रियकरासोबत अखेर ठाणे शहर पोलिसांनी तब्बल सहा वर्षांनी अटक केली.

A married man who stole from his husband's house was finally arrested along with his lover after six years | नवऱ्या घरात चोरी करणाऱ्या विवाहितेला प्रियकरासह अखेर सहा वर्षांनी अटक

नवऱ्या घरात चोरी करणाऱ्या विवाहितेला प्रियकरासह अखेर सहा वर्षांनी अटक

googlenewsNext

ठाणे : पतीच्या घरात त्याचे वडीलोपार्जित ५५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून प्रियकरासोबत पळणाऱ्या विवाहित महिलेला त्याच्या प्रियकरासोबत अखेर ठाणे शहर पोलिसांनी तब्बल सहा वर्षांनी अटक केली. त्या दोघांनी चोरीचे सोन्याचे दागिण्यांची विक्री करून स्वतःचा कोणास संशय येवु नये, याकरीता गोकर्ण ( कनार्टक), गोवा, चिपळुन, रत्नागिरी, तळोजा या भागात अस्तित्व बदलुन राहत होते. तसेच बदललेल्या नावाचे गॅझेट प्रसिध्द करून त्याद्वारे पॅनकार्ड, आधारकार्ड बनवुन वेगवेगळया ठिकाणी वास्तव्य करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे पोलीस आयुक्तालयातील कापुरबावडी पोलीस ठाण्याचे हद्दीत २५ डिसेंबर २०१७ रोजी फिर्यादी यांच्या पत्नीचे, घरासमोर राहणाऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. सासरकडील वडीलोपार्जित सोन्यांच्या दागिण्यांची व रोख रक्कमेची चोरून प्रियकरासोबत पळून गेली. याप्रकरणी भादवि कलम ३८०, ३४ प्रमाणे दाखल झाला होता. हा गुन्हा घडल्यापासुन ते दोघांचा  मालमत्ता गुन्हे कक्ष पथकामार्फत शोध घेतला जात होता.मात्र गुन्हयात कोणताही धागादोरा नसताना सततच्या चिकाटीने, व बारकाईने तांत्रिक विश्लेषण करून त्या चोरट्यांचे ठावठिकाणाची माहिती प्राप्त करून त्यांचा शोध घेत अखेर अटक केली. चौकशीत त्या दोघांनी फिर्यादी यांचे घरातील वडीलोपार्जित ५५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कमेची चोरी केली व चोरीचे सोन्याचे दागिण्यांची विक्री करून स्वतःचा कोणास संशय येवु नये याकरीता गोकर्ण ( कनार्टक), गोवा, चिपळुन, रत्नागिरी, तळोजा या भागात अस्तित्व बदलुन राहत असताना मंगेश संतोष मंगरशी याने स्वतःचे नांव मयांक केशव लांजेकर व विवाहित महिलेने ज्योती मंगेश पाटील हिने तिचे नांव उन्नती मयंक लांजेकर असे बदलुन त्या नावाचे गॅझेट प्रसिध्द करून त्याद्वारे पॅनकार्ड, आधारकार्ड बनवल्याची कबुली दिली. तसेच ते वेगवेगळया ठिकाणी वास्तव्य करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 ही कामगिरी मालमत्ता गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, सहायक पोलीस निरीक्षक महेश जाधव, जगदीश मुलगीर, सहायक पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील प्रधान, पोलीस हवालदार प्रशांत भुर्के, किशोर भामरे, रूपवंत शिंदे, नागराज रोकडे, राजाराम शेगर, संदीप भालेराव, अजित शिंदे, आशा गोळे व पोलीस अंमलदार अजय मोरे यांनी केलेली आहे.

Web Title: A married man who stole from his husband's house was finally arrested along with his lover after six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे